Homeताज्या बातम्याभारतीय संस्कृती जतन करणे काळाची गरज — आदिनाथ मंगेशकर

भारतीय संस्कृती जतन करणे काळाची गरज — आदिनाथ मंगेशकर

पुण्यात ‘हेरिटेज यात्रा–२०२६’चा दिमाखदार प्रारंभ
पुणे (प्रतिनिधी रविदास कदम) भारतीय संस्कृती ही जगातील सर्वांत प्राचीन, समृद्ध आणि विविधतेत एकता दर्शवणारी संस्कृती असून तिचे जतन करणे ही काळाची गरज असल्याचे मत प्रसिद्ध संगीततज्ज्ञ आदिनाथ मंगेशकर यांनी व्यक्त केले. पुणे महानगरपालिका आणि एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी (एमआयटी एडीटी) विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने सिंहगड रोड येथील पु. ल. देशपांडे कलाग्राम येथे आयोजित ‘हेरिटेज यात्रा–२०२६’ महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
भारतीय संस्कृतीतील वसुधैव कुटुंबकम्, शांतता, सहिष्णुता, आदर आणि आध्यात्मिक मूल्यांवर आधारित जीवनपद्धती ही वैशिष्ट्ये असल्याचे सांगताना त्यांनी पाश्चिमात्य संस्कृती समजून घेत असतानाच भारतीय वारसा जपणे अत्यावश्यक असल्याचे नमूद केले. पारंपरिक हस्तकलेपासून आधुनिक ऑगमेंटेड रिअॅलिटी (एआर) तंत्रज्ञानापर्यंतचा अनुभव देणारा हा महोत्सव कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला फिल्म्स विभाग व दूरदर्शनचे माजी महासंचालक मुकेश शर्मा, पुणे महानगरपालिकेच्या सांस्कृतिक विभागाचे प्रशासकीय अधिकारी राजेश कामठे, एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या कार्यकारी संचालक ज्योती ढाकणे-कराड, कुलगुरू डॉ. राजेश एस., प्र-कुलगुरू डॉ. नचिकेत ठाकूर, निमंत्रक डॉ. अश्विनी पेठे, डॉ. अतुल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजेश एस. यांनी भविष्याकडे वाटचाल करताना संस्कृतीचा भक्कम पाया आवश्यक असल्याचे सांगत वैदिक संस्कृतीच्या मुळांकडे पुन्हा वळण्याचे आवाहन केले. तर राजेश कामठे यांनी पुणे महानगरपालिका अशा नाविन्यपूर्ण सांस्कृतिक उपक्रमांना नेहमीच पाठबळ देईल, असा विश्वास व्यक्त केला. कार्यकारी संचालक ज्योती ढाकणे-कराड यांनी कला ही भारतीयांची जीवनपद्धती असून विद्यार्थ्यांनी कला क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहावे, असे आवाहन केले.
उद्घाटनाच्या दिवशी विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी पारंपरिक विटांची भिंत बांधणी, आभासी ऐतिहासिक सफर (Immersive Heritage), मातीकाम, नाट्य कार्यशाळा, गोंड पेंटिंग, श्लोक पठण, वारली चित्रकला आणि सामुदायिक विणकाम यांसारख्या उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला. हा विनामूल्य महोत्सव ७ फेब्रुवारीपर्यंत सुरू असून पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
शनिवारवाड्यापासून ‘हेरिटेज वॉक’चे आयोजन
महोत्सवातील ‘हेरिटेज प्लेलँड’मध्ये इतिहासावर आधारित विविध खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘महामिस्टरी’, ‘डार्ट अँड डिस्कव्हर’, ‘अराउंड इंडिया’ आणि ‘मिस्टरी बॉक्स पझल’ या खेळांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘महाराष्ट्रासाठी स्वतःचे चलन डिझाईन’ या उपक्रमात विद्यार्थ्यांनी सर्जनशीलतेचे दर्शन घडवले. तसेच ६ व ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता शनिवारवाड्यापासून ‘हेरिटेज वॉक’चे आयोजन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

इच्छुक पोलिसाची ३.७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा | पुणे बातम्या

0
प्रातिनिधिक हेतूसाठी चित्र पुणे : पोलीस भरती मोहिमेदरम्यान नोकरीचे आमिष दाखवून २४ वर्षीय इच्छुक पोलीस हवालदाराची ३.७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भोसरी एमआयडीसी...

महा मेट्रो, पीएमपीएमएल शहरभर अखंड ट्रेन-बस प्रवासासाठी ‘एक प्रवास, एक तिकीट’ प्रणाली शोधत आहे

0
एकात्मिक तिकीट व्यतिरिक्त, महा मेट्रो आणि पीएमपीएमएल फीडर कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यावर देखील भर देत आहेत पुणे : महा मेट्रो आणि पीएमपीएमएल ट्रेन आणि...

विश्रांतवाडी रोडवरील बीआरटीएस लेन पाडण्यास पीएमसीच्या स्थायी समितीने मंजुरी दिली आहे

0
PMC स्थायी समितीने विश्रांतवाडी रोडवरील 4.5 किमी समर्पित बस कॉरिडॉर हटविण्यास मंजुरी दिली आहे. पुणे : बीआरटीएस लेन पाडण्याच्या प्रलंबित निर्णयाने अखेर अंतिम...

पुण्याच्या बागायतदारांनी विदेशी फळे आणि औषधी वनस्पती घेतल्याने टेरेस उष्णकटिबंधीय बनतात

0
शहरातील घराच्या बागेतून एवोकॅडोची नवीन कापणी पुणे : पुण्यातील गृह बागायतदारांची वाढती संख्या टेरेस, बाल्कनी आणि घरामागील अंगणांचे रूपांतर मिनी फार्ममध्ये करत आहेत,...

राम मंदिरातील दानरकमेची चोरी उघड; कर्मचाऱ्याच्या घरातून ₹१० लाखांची रोकड जप्त

0
पुणे /प्रतिनिधी रोहिदास कदम मिळालेल्या माहिती अनुषंगाने अयोध्येतील राम मंदिरातील दानपेटीतील रक्कम चोरीप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत मंदिरातील एका कर्मचाऱ्याच्या घरातून सुमारे ₹१० लाखांची...

Translate »
error: Content is protected !!