Homeताज्या बातम्याकल्पनाताईपाटील गवारी मैदानात; कमळ चिन्हावर मतदानाचे आवाहन कुरुळी (आळंदी ग्रामीण).

कल्पनाताईपाटील गवारी मैदानात; कमळ चिन्हावर मतदानाचे आवाहन कुरुळी (आळंदी ग्रामीण).

प्रतिनिधी रोहिदास कदम
कुरुळी (आळंदी ग्रामीण) : सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी कटिबद्ध असलेल्या कल्पनाताई पाटील गवारे या कुरुळी आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. पंचायत समितीच्या माजी सभापती तसेच खेड तालुका भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा आणि महिला सक्षमीकरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे.
देशाचे कणखोर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार चंद्रकांत दादा पाटील, आमदार महेश दादा लांडगे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रदीप दादा कंद कृष्ण खोरे.सदस्य रामशेठ गावडे तसेच प्रदेश महिला अध्यक्षा आमदार चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवेचे काम करण्यासाठी त्या निवडणूक मैदानात उतरल्या आहेत.
सन २०१२ मध्ये पंचायत समिती सभापती असताना त्यांनी माता-भगिनींसाठी विविध योजना राबवल्या. महिलांसाठी शिलाई मशीन, मिरची कडबा कुटी, पिठाची गिरणी, महिला बचत गटांमार्फत व्यवसाय प्रशिक्षण, शेतकरी बांधवांसाठी शेती पंप, पाइपलाईन, कृषी अवजारे तसेच विद्यार्थ्यांसाठी आणि दिव्यांगांसाठी विविध उपक्रम राबवून अनेकांना लाभ मिळवून दिला. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तसेच इतर शासकीय योजनांचा लाभ हजारो लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात त्यांनी सक्रिय भूमिका बजावली. स्थानिक तरुण-तरुणींसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले.
रिंग रोड आणि रेल्वे संबंधित जमीन संपादन प्रकरणात शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करताना त्यांनी पुढाकार घेतला. या आंदोलनादरम्यान त्यांना आणि सहकाऱ्यांना तुरुंगवास भोगावा लागला, मात्र शासनाकडून शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मिळवून देण्यात यश आले. कोविड महामारीच्या काळात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्यावर उतरून मदतकार्य केले; स्वतः बाधित झाल्यानंतरही त्यांनी समाजसेवेचा ध्यास कायम ठेवला.
स्थानिक प्रश्नांमध्ये एमआयडीसीमधील पाणी ठेकेदारी गुंडागिरी समस्या, सोळु. धानोरी चेव्हली स्थानिक समस्या
खिंडीतील दुरवस्था, पोलीस कॅबिन उभारणी, रस्ता रुंदीकरण यांसह गावागावात नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक गावामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे. आळंदी ग्रामीण रुग्णालय 100 कोट करण्याचे नियोजन.
७ तारखेला होणाऱ्या मतदानात मतदारांनी कमळ या चिन्हावर मतदान करून सेवा करण्याची संधी द्यावी, असे आवाहन कल्पनाताई पाटील गवारी यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

श्री क्षेत्र मरकळ येथे गुरुपौर्णिमा महोत्सव भक्तिभावात संपन्न; धार्मिक विधी, पालखी सोहळा आणि महाप्रसादासाठी...

0
मरकळ,( प्रतिनिधी रोहिदास कदम)गुरुतत्त्वाविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा आणि अध्यात्माची अनुभूती देणारा गुरुपौर्णिमा महोत्सव यंदा श्री क्षेत्र मरकळ येथील पंचलिंग देवस्थान दत्तभक्त ताई माऊली मठात...

गुरुपौर्णिमेनिमित्त मातोश्री चंद्रभागा आश्रमात भक्तिमय वातावरणात गुरुपूजन व कीर्तन सोहळा संपन्न

0
अंबाजोगाई, प्रतिनिधी (मेघा चाटे) : परळी वैजनाथ तालुक्यातील मातोश्री चंद्रभागा आश्रम, वैद्यनाथ मंदिराच्या पूर्वेस तुकाई रोड येथे परमपूज्य वै. ह. भ. प. गुरुवर्य मृदंड...

आंबेजोगाई येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन

0
आंबेजोगाई येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन केज (प्रतिनिधी – मेघा चाटे | मानव मित्र न्यूज): छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर...

‘हे आमचे मंदिर आहे’: दिल्लीतील पर्यटकांना महाराष्ट्राच्या लोहगड किल्ल्यावर धुम्रपान करण्यासाठी स्थानिकाने शिकविले

0
पुणे: महाराष्ट्राच्या ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावरील व्हायरल झालेल्या व्हिडिओने संरक्षित वारसा स्थळांवर पर्यटकांच्या वर्तनावर पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे.या क्लिपमध्ये किल्ल्याच्या तटबंदीवर...

मी पायउतार होण्यापूर्वी सर्व मुद्दे निकाली काढले होते: माजी डीएलटीए प्रमुख अनिल खन्ना

0
पुणे: ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (AITA) तसेच दिल्ली लॉन टेनिस असोसिएशन (DLTA) चे माजी अध्यक्ष अनिल खन्ना यांनी बुधवारी सांगितले की, DLTA...

Translate »
error: Content is protected !!