Homeताज्या बातम्याबीड बायपासवरील भीषण अपघातात दत्त संप्रदायाचे ज्येष्ठ संत कालिदास महाराज यांचे निधन;...

बीड बायपासवरील भीषण अपघातात दत्त संप्रदायाचे ज्येष्ठ संत कालिदास महाराज यांचे निधन; भाविकांमध्ये शोककळा प्र

पुरंदर सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार
मिळालेल्या माहिती अनुषंगाने.परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील श्रीक्षेत्र गुंज येथील दत्त संप्रदायाचे ज्येष्ठ संत परमपूज्य कालिदास महाराज यांचे छत्रपती संभाजीनगर येथील बीड बायपास परिसरात झालेल्या भीषण रस्ते अपघातात दुर्दैवी निधन झाले. या अपघातात त्यांच्या भावजय स्मिता बोरीकर यांचाही मृत्यू झाला असून वाहनचालक गंभीर जखमी झाला आहे. या दुःखद घटनेमुळे श्रीक्षेत्र गुंजसह संपूर्ण मराठवाड्यात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टेंबे स्वामी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त दर्शनासाठी कालिदास महाराज श्रीक्षेत्र गरुडेश्वर येथे गेले होते. दर्शन आटोपून ते आपल्या सहकाऱ्यांसह श्रीक्षेत्र गुंजकडे परतत असताना बीड बायपास परिसरात त्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. अपघात इतका गंभीर होता की कालिदास महाराज आणि स्मिता बोरीकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर वाहनचालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गेली अनेक दशके मौनव्रताचे पालन करणारे कालिदास महाराज हे दत्त संप्रदायातील आदरणीय संत म्हणून ओळखले जात होते. अध्यात्म, व्यसनमुक्ती, समाजप्रबोधन आणि मानवसेवा यासाठी त्यांनी आयुष्य समर्पित केले होते. त्यांच्या प्रवचनांमधून आणि सेवाभावी कार्यातून हजारो भाविकांना प्रेरणा मिळाली होती.
कालिदास महाराज यांच्या निधनाची वार्ता समजताच श्रीक्षेत्र गुंज येथे भाविकांनी मोठी गर्दी केली. विविध धार्मिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या जाण्याने दत्त संप्रदायाची मोठी हानी झाल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रधान यांच्या राजीनाम्याबद्दल पुण्यात तरुण मंडळांनी आनंदोत्सव साजरा केला पुणे बातम्या

0
पुणे : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर शनिवारी शहरात अनेक ठिकाणी जल्लोष करण्यात आला. SPPU टीचर्स असोसिएशनने शनिवारी देशभरातील आंदोलक विद्यार्थ्यांवर...

ग्राहक तक्रार पोर्टलवर गोपनीयतेची चिंता वाढवतात, FDA म्हणते डेटा सुरक्षित | पुणे बातम्या

0
तक्रार नोंदवण्यासाठी दिलेल्या त्यांच्या खाजगी तपशिलांचा गैरवापर होऊ शकतो, अशी भीती नागरिकांना वाटत आहे पुणे : अन्न आणि औषध प्रशासन (FDA) च्या ऑनलाइन...

विश्वचषक सुवर्णपदक विजेता लक्ष्य डोप चाचणीत नापास झाला

0
पुणे: भारतीय रोइंग आणि विशेषतः आर्मी रोइंग नोड (एआरएन) साठी मोठ्या पेचप्रसंगात, विश्वचषक सुवर्णपदक विजेता लक्ष्य याला स्पर्धेबाहेरील डोप चाचणीत सकारात्मक निकाल...

शिरूरमध्ये भितीच्या ढगाखाली बिबट्याने 2 वर्षात 5 व्या चिमुकल्याचा बळी घेतला पुणे बातम्या

0
वन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की पिंपळसुटी, मांडवगण फराटा आणि आजूबाजूची गावे मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड, विखुरलेली फार्महाऊस आणि बिबट्यांसाठी आदर्श आच्छादन आणि अधिवास...

गढूळ नळाच्या पाण्याच्या तक्रारींमध्ये रहिवासी पॅकेज्ड पाण्याकडे वळले | पुणे बातम्या

0
संपूर्ण शहरात 20-लिटर पॅकेज्ड पिण्याच्या पाण्याच्या कॅनची मागणी वाढली आहे पुणे: PMC कडून अनियमित पुरवठा आणि गढूळ, विरंगुळ्या पाण्याच्या अहवालांमुळे संपूर्ण शहरात 20-लिटर...

Translate »
error: Content is protected !!