Homeताज्या बातम्यापुरोगामी संघर्ष परिषदेच्या प्रदेश कार्यालयाचे सासवडमध्ये दिमाखात उद्घाटन

पुरोगामी संघर्ष परिषदेच्या प्रदेश कार्यालयाचे सासवडमध्ये दिमाखात उद्घाटन

सासवड (दि. ५ जून २०२६
‘अधिकारी ऐकत नसतील तर जनतेची ताकद दाखवा’ – डॉ. प्रा. सुभाष वायदंडे यांचा आक्रमक इशारा.

तळागाळातील सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि प्रशासकीय अन्यायाविरोधात संघटित लढा उभारण्यासाठी पुरोगामी संघर्ष परिषदेचे प्रदेश कार्यालय हे एक प्रभावी शक्तीपीठ ठरेल, असा ठाम विश्वास परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रा. सुभाष वायदंडे यांनी व्यक्त केला. सासवड येथे सोमवारी या कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
उद्घाटनानंतर मार्गदर्शन करताना डॉ. वायदंडे म्हणाले,
“हे कार्यालय म्हणजे केवळ भिंतींचे बांधकाम नाही, तर सामान्य जनतेच्या हक्कांचे व्यासपीठ आहे. जर शासकीय अधिकारी नियमाप्रमाणे काम करत नसतील, गरिबांना किंवा वंचितांना त्रास देत असतील, तर लोकशाही मार्गाने संघर्ष करा आणि त्यांना जाब विचारा. आता जनतेची ताकद दाखवण्याची वेळ आली आहे.”
ते पुढे म्हणाले की,
हे कार्यालय
शासकीय योजनांपासून वंचित राहिलेल्या नागरिकांसाठी मार्गदर्शन केंद्र,
अन्यायग्रस्त महिला व शोषित घटकांसाठी कायदेशीर मदतीचे केंद्र,
युवक-युवतींच्या सक्षमीकरणासाठी व रोजगार विषयक मार्गदर्शनासाठी चर्चेचे व्यासपीठ
म्हणून कार्यरत राहिले पाहिजे. तसेच, नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करून संबंधित अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाचे नियोजन राज्य युवक अध्यक्ष मनोज दादा भिसे, पुणे जिल्हाध्यक्ष गोकुळ तात्या भिसे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र सल्लागार समितीचे अध्यक्ष प्राचार्य पंढरीनाथ आढाळगे, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख किशोर आढाळगे, पुरंदर तालुका संपर्कप्रमुख चंद्रकांत भिसे, तालुका महिला आघाडी अध्यक्षा रोहिणी कुंभारकर, सासवड शहराध्यक्ष सचिन भोंडे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष संदीप भोंडे, पुणे शहराध्यक्ष लताताई खुडे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष लालासो खंडाळे, रिक्षा संघटना जिल्हाध्यक्ष श्री. ढवळे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
राज्य पातळीवरील प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये वरिष्ठ राज्य समन्वयक रमेश सोनवणे, वरिष्ठ राज्य कार्याध्यक्ष उदयसिंह बागाव, राज्य संपर्कप्रमुख भानुदास मामा भिसे, राज्य युवक कार्याध्यक्ष निलेश खुडे, सल्लागार समिती राज्य सदस्य अशोकराव धनवडे, सातारा ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुनील मांढरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
याशिवाय विविध सामाजिक, राजकीय व प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवर, ग्रामसेवक, सरपंच, नगरसेवक, दिव्यांग व श्रमिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

इंद्रायणी नदीत हजारो माशांचा मृत्यू; प्रशासन झोपेत, वारकऱ्यांमध्ये संतापाचा उद्रेक!

0
पुणे सासवड (प्रतिनिधी अशोक कुंभार) देहू नगरीतील पवित्र इंद्रायणी नदीत हजारो मासे मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या तोंडावर घडलेल्या...

पुणे विद्यापीठाच्या ५० हून अधिक अभ्यासक्रमांसाठी जागांपेक्षा कमी अर्जदार

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रवेशाचे मोठे संकट आहे पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) मधील लक्षणीय शैक्षणिक कार्यक्रम त्यांच्या मंजूर प्रवेशाची पूर्तता करण्यासाठी...

इच्छुक पोलिसाची ३.७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा | पुणे बातम्या

0
प्रातिनिधिक हेतूसाठी चित्र पुणे : पोलीस भरती मोहिमेदरम्यान नोकरीचे आमिष दाखवून २४ वर्षीय इच्छुक पोलीस हवालदाराची ३.७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भोसरी एमआयडीसी...

महा मेट्रो, पीएमपीएमएल शहरभर अखंड ट्रेन-बस प्रवासासाठी ‘एक प्रवास, एक तिकीट’ प्रणाली शोधत आहे

0
एकात्मिक तिकीट व्यतिरिक्त, महा मेट्रो आणि पीएमपीएमएल फीडर कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यावर देखील भर देत आहेत पुणे : महा मेट्रो आणि पीएमपीएमएल ट्रेन आणि...

विश्रांतवाडी रोडवरील बीआरटीएस लेन पाडण्यास पीएमसीच्या स्थायी समितीने मंजुरी दिली आहे

0
PMC स्थायी समितीने विश्रांतवाडी रोडवरील 4.5 किमी समर्पित बस कॉरिडॉर हटविण्यास मंजुरी दिली आहे. पुणे : बीआरटीएस लेन पाडण्याच्या प्रलंबित निर्णयाने अखेर अंतिम...

Translate »
error: Content is protected !!