(पुरंदर सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार,) दुःखद वार्ता | पगारे परिसरात शोककळा
पुरंदर तालुक्यातील पगारे येथील ज्येष्ठ समाजसेवक के. शंकरराव मारुती ननावरे यांचे दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 9 वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने पंगारे, पाचकरशी तसेच संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
शंकरराव ननावरे हे सामाजिक, शैक्षणिक आणि सहकारी क्षेत्रात सक्रिय योगदान देणारे व्यक्तिमत्व होते. त्यांनी अनेक संस्थांमध्ये महत्त्वाची जबाबदारी पार पाडली होती.
त्यांची ओळख पुढीलप्रमाणे होती:
पुरंदर नागरी संस्थेचे संस्थापक सल्लागार
शिवाजी शिक्षण संस्थेचे विश्वस्त
शरद कृषी संस्थेचे संचालक
साईकृपा ग्राहक भंडार संचालक
श्री निष्णाई फळ प्रक्रिया उद्योग चेअरमन
पांगरी विकास सोसायटीचे माजी चेअरमन व तब्बल 38 वर्ष संचालक
तसेच ते स्वर्गीय चंदुकाका जगताप यांचे सहकारी व माजी आमदार संजय जगताप यांचे समर्थक म्हणूनही परिचित होते.
त्यांच्या पश्चात पुत्र विशाल शंकरराव ननावरे आणि प्रवीण शंकरराव ननावरे असा परिवार आहे.
📅 दशक्रिया विधी: 3 मे 2026 (रविवार)
📍 स्थळ: पंगारे
त्यांच्या निधनाने सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून सर्व स्तरातून श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























