Homeताज्या बातम्याअलंकापुरीत हरिनामाच्या गजरात रामजन्मोत्सव सोहळ्याची भव्य सांगता रामरायांच्या पालखीचे माऊली मंदिरात

अलंकापुरीत हरिनामाच्या गजरात रामजन्मोत्सव सोहळ्याची भव्य सांगता रामरायांच्या पालखीचे माऊली मंदिरात

,आळंदी प्रतिनिधी रविदास कदम ,)                        रामरायांच्या पालखीचे माऊली मंदिरात स्वागत; धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्सव रंगला

अलंकापुरी नगरीत आवेकर-भावे रामचंद्र संस्थानच्या वैभवी श्री राम मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या रामजन्मोत्सव सोहळ्याची हरिनामाच्या गजरात उत्साहात सांगता करण्यात आली. श्री रामरायांच्या पालखीचे माऊली मंदिरात आगमन होताच भाविकांनी जय श्रीरामच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. त्यानंतर ग्रामप्रदक्षिणा मिरवणूक, आरती व प्रसाद वितरणाने सोहळ्याची परंपरेनुसार सांगता झाली.

रामजन्मोत्सव निमित्त ज्ञानेश्वरबुवा कपलाने महाराज यांच्या हृदयस्पर्शी वाणीतून नारदीय कीर्तन सेवा पार पडली. श्रींचा अभिषेक, वेदमंत्रांचा जयघोष, हरिनाम गजर आणि पुष्पवृष्टी यामुळे वातावरण भक्तिमय झाले होते. मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांची सजावट आणि रांगोळ्यांनी सजलेले मार्ग भाविकांचे लक्ष वेधून घेत होते.

ग्रामप्रदक्षिणेत हरिनामाचा जल्लोष

श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्था आणि अध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेच्या साधकांनी हरिनामाचा गजर करत ग्रामप्रदक्षिणा काढली. बँड, नगारखाना आणि भजन मंडळांच्या सहभागामुळे मिरवणुकीला उत्साहाचे स्वरूप प्राप्त झाले. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रीरामाचे दर्शन घेतले.

विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

रामजन्मोत्सवानिमित्त संगीत, नृत्य आणि भक्ती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. भरतनाट्यम, अभंग गायन, वाद्य संगीत, भजन सेवा आणि कीर्तन कार्यक्रमांनी भाविक मंत्रमुग्ध झाले. सुमारे २५० मान्यवर, सेवक आणि भाविकांचा सत्कार करण्यात आला.

चंदन उटीतून शिंदेशाही अवतार आकर्षणाचा केंद्रबिंदू

रामनवमी निमित्त माऊलींच्या संजीवन समाधीवर चंदन उटीतून साकारण्यात आलेला शिंदेशाही राजबिंडा अवतार भाविकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. पुण्यातील मूर्तिकार अभिजीत धोंडफळे व सहकाऱ्यांनी हा देखणा अवतार साकारला. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन घेतले.

मान्यवरांची उपस्थिती.                                 

सोहळ्यास आवेकर-भावे रामचंद्र संस्थानचे प्रमुख विश्वस्त राहुल आवेकर, अर्जुन मेदनकर, चिन्मय चोभे, बिपीन चोभे, रमेश मुसुडगे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच आळंदी देवस्थानचे पदाधिकारी, नागरिक व भाविकांनी उत्साहात सहभाग घेतला.

कडक पोलीस बंदोबस्त

उत्सव काळात आळंदी पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम शांततेत पार पडले.

अलंकापुरीत पार पडलेला रामजन्मोत्सव सोहळा धार्मिक, सांस्कृतिक आणि भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरा झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

३ वर्षाच्या चिमुरडीने चार जणांना जीवदान दिले, पुणे विभागातील सर्वात तरुण बाल अवयव दाता...

0
शहरातील घराच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून तीन वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला. पुणे : 12 जून रोजी ब्रेन डेड घोषित केलेला तीन वर्षांचा मुलगा...

गुठळ्या त्वचेच्या आजाराचा सामना करण्यासाठी महाराष्ट्रात शेळीपॉक्स लस उत्पादनास सुरुवात झाली

0
प्रातिनिधिक हेतूसाठी चित्र पुणे : राज्य पशुसंवर्धन विभागाच्या पशुवैद्यकीय जैविक उत्पादनांच्या संस्थेने (IVBP) प्रथमच गुरांचे ढेकूळ त्वचा रोग (LSD) पासून संरक्षण करण्यासाठी गोटपॉक्स...

कर्जमाफी योजनेनंतर कंपनी सेक्रेटरी कोर्समध्ये 1,000 पर्यंत ड्रॉपआउट्स पुन्हा सामील होतात

0
इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष पवन चांडक पुण्यात बोलत होते पुणे : इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) ने...

‘अनुकूल कामाची नियुक्ती नाकारली’: प्रकल्प व्यवस्थापकांनी पुण्यातील तंत्रज्ञांना आत्महत्येकडे कसे वळवले

0
प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते पुणे : पुणे जिल्ह्यातील ४८ वर्षीय आयटी व्यावसायिकाच्या कथित आत्महत्येनंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आयटी फर्मच्या दोन कर्मचाऱ्यांसह तिघांविरुद्ध...

पुणे टीसीएस तंत्रज्ञ आत्महत्या: ‘ऑनलाइन मित्राची’ वैवाहिक वितुष्ट, रजेवरून महिला सहकाऱ्यांचा छळ; नवीन तपशील...

0
पुणे: कामाच्या ठिकाणी होणारा छळ, कौटुंबिक शोकांमुळे रजा मिळण्यात येणाऱ्या अडचणी आणि पत्नीच्या दीर्घ आजाराचा ताण यामुळे 48 वर्षीय टीसीएस कर्मचाऱ्याने 2...

Translate »
error: Content is protected !!