
– अनुसूचित जाती मोर्चा, भाजप पुणे जिल्हा यांच्या वतीने अभिनव उपक्रम
पुणे (प्रतिनिधीअशोक कुंभार:)
भारताचे लोकप्रिय आणि दूरदृष्टी असलेले पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सेवा सप्ताह आयोजित करण्यात आला. या विशेष उपक्रमात अनुसूचित जाती मोर्चा, भारतीय जनता पक्ष – पुणे जिल्हा यांच्या वतीने पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी ७५०० पोस्टल कार्डे पाठविण्यात आली.
या शुभेच्छा पत्रांमधून मोदीजींना “GST सुधारणा करून जगण्याची सुलभता वाढविल्याबद्दल, आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याच्या प्रयत्नांबद्दल आणि राष्ट्रासाठी दिलेल्या ऐतिहासिक दिवाळी भेटीबद्दल धन्यवाद” अशा मनापासून शुभेच्छा व कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमाचे मार्गदर्शन तंत्र व उच्च शिक्षण मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील, पुण्याचे खासदार मा. मुरलीधर मोहोळ, तसेच भाजप पुणे जिल्हाध्यक्ष मा. शेखरजी वाढणे आणि अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष मयूर चंद्रकांत कांबळे यांनी केले.
या कार्यक्रमात प्रमुख पदाधिकारींचा सक्रिय सहभाग होता. त्यामध्ये पुणे जिल्हा सरचिटणीस रवींद्र साळवे, अॅड. किशोरदादा अडसूळ (जिल्हा सरचिटणीस), निखिल आढळगे (जिल्हा सचिव), लक्ष्मण अण्णा पवार (उपाध्यक्ष), सोशल मीडिया संयोजक दत्ता धेंडे, विष्णूदादा कांबळे (सरचिटणीस), सुनील ओव्हाळ, दिनेश गंगावणे, नितीन आरडे, अण्णा धावरे आणि अन्य अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाद्वारे मोदीजींवरील प्रेम आणि आदराचे दर्शन घडविण्यात आले असून, या अनोख्या शुभेच्छा मोहिमेला उपस्थित मान्यवरांनीही मोठा प्रतिसाद दिला. सेवा सप्ताह उपक्रमाद्वारे “सेवा हीच संघटनाची ओळख” हा संदेश पुन्हा एकदा अधोरेखि.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























