
📍 (पुणे: उपसंपादक अँड जगदीश दशरथ सोनवणे)
भारताचे सरन्यायाधीश मा. भूषण गवई यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करत महाराष्ट्र बहुजन लॉयर्स ऑर्गनायझेशन तर्फे पुणे जिल्हा न्यायालयात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाद्वारे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींवर झालेल्या हल्ल्याचा निषेध नोंदवण्यात आला.
या आंदोलनाचे नेतृत्व अँड किरण कदम यांनी केले. आंदोलनात अनेक वकिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. त्यामध्ये अँड. राहुल ढाले, अँड. सुमेध घनवट, अँड. अजय डोळस, अँड. शारदा वाडेकर, अँड एकनाथ जावीर, अँड राणी कांबळे, अँड. एकनाथ सुगावकर, अँड. सचीत मुंडडा, अँड. जगदीश सोनवणे, अँड मनीष मगर, अँड. अतुल सोनवणे, अँड संतोष जाधव, अँड संघमित्रा गायकवाड, अँड फारिया टीनवाला, अँड. अनिल नगराळे, अँड. किरण सुरवाडे, अँड. रमन घोरपडे, अँड विशाल सोनवणे, अँड राज जाधव, अँड यशवंत गायकवाड, अँड प्रियंका गायकवाड, अँड. प्रियंका खंडाळे, अँड जावळे, अँड. रणखांबे, अँड. सूरज कांबळे, अँड विजयसिंह निकम, अँड विश्वजीत पाटील, अँड त्रिभुवन, अँड. बनसोडे, अँड त्रिरत्ना बागुल, अँड शाक्य, अॅड. भडकवाड, अँड
. श्रुती संपकाळ आदींचा समावेश होता.
या आंदोलनात वकिलांनी “न्याय व्यवस्थेवरील हल्ले थांबले पाहिजेत”, “न्यायसंस्थेचा सन्मान राखा” अशा घोषणांनी परिसर दणाणून टाकला. वकिलांच्या मोठ्या संख्येने सहभागामुळे या आंदोलनाला विशेष महत्त्व लाभले.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम























