संत ज्ञानेश्वर महाराजांचा 750 वा जन्मोत्सव — माऊली मंदिराला 24 किलो सुवर्णकलश अर्पण, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भव्य सोहळा
📍 पुणे आळंदी|रवि कदम
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 750 व्या जन्मोत्सवानिमित्त माऊली मंदिरात 24 किलो सुवर्णकलश अर्पण करण्याचा ऐतिहासिक सोहळा मोठ्या भक्तिभावाने पार पडला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, विधानसभा सभापतीनीलम गोऱ्हे, खासदार रत्न श्री. श्रीरंग आप्पा बारणे खेड विधानसभा आमदार बाबाजी काळे, भोसरी विधानसभा महेश दादा लांडगे शिरूर, आमदार माऊली कटके आमदार बापू पठाडे जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, उपजिल्हाप्रमुख प्रकाश वाडेकर, तालुका प्रमुख निलेश पवार, शहर प्रमुख राहुल चव्हाण, माजी विरोधी पक्षनेते डीडी भोसले पाटील, माजी नगराध्यक्ष बबनराव पर्वतराव कुऱ्हाडे माऊली देवस्थानच्या ट्रस्टचे एडवोकेट राजेंद्र उमाप, योगी निरंजननाथ, चैतन्य महाराज लोंढे, कबीर बुवा, भावार्थ देखणे, रोहिणी पवार, पुरुषोत्तम पाटील, माऊलीमानकरी राहुल चितळकर पाटील, माजी नगराध्यक्ष श्री यांचे मानकरी योगीराज कुऱ्हाडे, व्यवस्थापक माऊली वीर, नगरपरिषद मुख्याधिकारी महादेव खांडेकर, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनायक चौबे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा न्यायाधीश महेंद्र महाजन, खेड तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्या उपस्थितीत सुवर्णकलश पूजन करून मंदिराच्या कळसावर प्रतिष्ठापना करण्यात आली.
माऊली संस्थान आळंदी ग्रामस्थ व वारकरी संस्था वतीने सायंकाळी 5 वाजता गुरुवर्य मामासाहेब दांडेकर पुतळा पार्किंग येथून भाग्यदिव्य मिरवणुकीला सुरुवात झाली. साडेसात हजार टाळकरी, मृदंगाचार्य, तुळशी-वृंदावन घेऊन आलेल्या महिलांच्या सहभागामुळे संपूर्ण परिसर भक्तिरंगात रंगला. “ज्ञानोबा माऊली”च्या गजरात ही मिरवणूक अत्यंत भव्यदिव्य पार पडली.
याच उत्सवाचा एक भाग म्हणून श्री क्षेत्र मरकळ येथे पंचलिंग देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष ताई माऊली व ग्रामस्थांच्या वतीने माऊली जन्मोत्सव मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. वारकरी, टाळकरी, मृदंगवादक आणि ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे परिसरात एक अद्वितीय आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले. रात्री दहा ते बारा कृष्ण जन्माचे किर्तन सेवा ह भ प प्रतीक महाराज पांचाळ व काल्याचे किर्तन राष्ट्रीय कीर्तनकार गोरक्ष महाराज वरपे यांचं होणार आहे

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























