🛕
सासवड (प्रतिनिधी , ( पत्रकार अशोक कुंभार सहकारी)
श्री संत सोपान काका मंदिर व सासवड पंचक्रोशी यांच्या प्रेरणेतून दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य “परिक्रमा दिंडी सोहळा” आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा सलग ९ दिवस चालणारा असून भक्तिमय वातावरण, श्रद्धा आणि समर्पणाचा संगम म्हणून ओळखला जातो.
या दिंडीत ना जात, ना धर्म, फक्त भक्तीचा ओघ दिसून येतो. तरुण असो वा वयोवृद्ध – सर्वांनी देहभान विसरून, भगवंताच्या नामस्मरणात तल्लीन होऊन, पायी प्रवास करत देवाकडे एकच मागणी करतात —
“माझा शेतकरी, कष्टकरी सुखी राहो.”
दररोज सकाळ-संध्याकाळ काकडा, पूजन, भजन, हरिपाठ, जागरण अशा धार्मिक कार्यक्रमांनी परिसर दुमदुमून जातो.
शेकडो वारकरी मंडळी आणि महाराज मंडळी देवांच्या पादुका घेऊन पालखीतून प्रवास करतात.
या दिंडीत सहभागी झालेल्या भक्तांसाठी अनेक सेवाभावी लोक मनोभावे नाश्ता, जेवण, पाण्याची व्यवस्था करतात. ही सेवा त्यांनी परमेश्वराचीच सेवा समजून अर्पण केली आहे.
सर्व भाविक, सेवाभावी मंडळी व आयोजकांचे मनःपूर्वक आभार 🙏
|| राम कृष्ण हरी ||

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























