संत साहित्य मूल्य शिक्षणातून व्यक्तिमत्व विकास
आळंदी / प्रतिनिधी : श्री ज्ञानेश्वरी जयंतीचे औचित्य साधूनओळख श्री ज्ञानेश्वरी एक परिवाराचे माध्यमातून पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघजाईनगर ( खराबवाडी ) या प्रशालेत ओळख श्री ज्ञानेश्वरी या संस्कारक्षम उपक्रमास हरिनाम गजरात सुरुवात झाली.
राज्यातील ११५ वर शाळांत ओळख श्री ज्ञानेश्वरीची एक परिवाराचे माध्यमातून प्रेरणादायी उपक्रम होत आहे. येत्या १७ सप्टेंबरला इंदिरा एकादशी चे औचित्य साधून पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाणेकरवाडी ( चाकण ) आणि २० सप्टेंबरला पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कडाचीवाडी ( चाकण ) या शाळांत मागणी प्रस्तावा प्रमाणे शालेय मुलांसाठी संस्कारक्षम असलेला उपक्रम सुरु केला जात आहे. अशी माहिती श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे यांनी दिली. श्री माऊलीच्या कृपा प्रसादाने सेवाकार्य होत आहे.
वाघजाईनगर प्रशालेत श्रींचे प्रतिमा पूजन करूनहरिनाम गजरात उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी मुख्याध्यापक दत्तात्रेय शेवकरी, ओळख श्री ज्ञानेश्वरी परिवारातील काळुराम येळवंडे, अर्जुन मेदनकर, विश्वंभर पाटील, कैलास आव्हाळे, सुंदर शितोळे, योगेश महाराज राऊत, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत मुलांशी संवाद साधला. प्रशालेस संस्कारक्षम पुस्तक साहित्य, संत साहित्य सुपूर्द करण्यात आले. श्री संत ज्ञानेश्वर महाराज ७५० जन्मोत्सवी वर्षा निमित्त प्रशालेस श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची लक्षवेधी प्रतिमा भेट देण्यात आली.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























