Homeताज्या बातम्यापुरंदर तालुक्यात संतापजनक प्रकार! शेलार वस्तीतील चार पाईपलाईन ट्रॅक्टरने फोडल्याचा आरोप; दोषींवर...

पुरंदर तालुक्यात संतापजनक प्रकार! शेलार वस्तीतील चार पाईपलाईन ट्रॅक्टरने फोडल्याचा आरोप; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

:पांगारे (ता. पुरंदर) | प्रतिनिधी अशोक कुंभार

पांगारे येथील शेतकऱ्यांची पोलिसांकडे तक्रार; पंधरा वर्षांपूर्वी टाकलेल्या पाईपलाईनचे नुकसान झाल्याचा दावा.
पुरंदर तालुक्यातील पांगारे येथील डोंगरभागातील शेलार वस्ती येथे शेतकऱ्यांच्या पाईपलाईनचे नुकसान झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. बुधवार, दि. १५ जुलै २०२६ रोजी संबंधित शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गट क्रमांक ३५८ मधील पंधरा वर्षांपूर्वी टाकण्यात आलेल्या चार पाईपलाईन ट्रॅक्टरच्या सहाय्याने फोडण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, गट क्रमांक ३५८ हा उत्तम किसन शेलार यांचा सामायिक गट असून या गटातून त्रिंबक भिकोबा शेलार, संजय यशवंत शेलार, सतपाल काळूराम शेलार आणि सिताराम हरिभाऊ शेलार यांच्या शेतीसाठी पाईपलाईन टाकण्यात आल्या होत्या. या पाईपलाईन १२ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास ट्रॅक्टरच्या सहाय्याने फोडण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणात तुषार उत्तम शेलार यांच्यावर आरोप करण्यात आला असून संबंधित ट्रॅक्टर मालकासह जबाबदार व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली असल्याचेही सांगितले आहे.
शेतकऱ्यांनी प्रशासन आणि पोलीस यंत्रणेकडे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांच्या शेतीसाठी अत्यावश्यक असलेल्या पाईपलाईनचे नुकसान झाल्यास त्याचा थेट परिणाम शेती आणि सिंचनावर होतो. त्यामुळे अशा प्रकारांना आळा बसण्यासाठी प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन कायद्यानुसार योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
टीप : या वृत्तातील आरोप तक्रारदार शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मांडण्यात आले आहेत. संबंधित प्रकरणाचा तपास पोलीस यंत्रणेकडून सुरू असून अंतिम निष्कर्ष तपासानंतर स्पष्ट होईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लाडेवडगाव येथे आषाढी एकादशी उत्साहात साजरी;

0
आंबेजोगाई |मानव मित्र न्यूज प्रतिनिधी मेघा चाटे) केज तालुक्यातील लाडेगाव येथील वेदांत साधना गुरुकुल येथे परमपूज्य स्वामी भारतानंदजी महाराज यांच्या मठावर आषाढी (देवशयनी) एकादशी निमित्त...

क्युरेटेड लाइफस्टाइल प्रदर्शनांनी या पावसाळ्यात पुणे व्यापले आहे | पुणे बातम्या

0
सणासुदीच्या अगोदर घरातील क्युरेट केलेले पिसू आणि प्रदर्शने पुणे: पावसाळा जोरात सुरू असताना आणि क्षितिजावर सणासुदीचा हंगाम असल्याने, शहरात इनडोअर फ्ली मार्केट आणि...

पुणे पोलिसांनी बिश्नोई टोळीशी संबंधित एआय-संचालित खंडणी रॅकेटला तडाखा दिला पुणे बातम्या

0
पुणे : अत्याधुनिक सायबर पोलिस दलावर डिजिटल धार मिळवण्यासाठी गुन्हेगार शांतपणे त्यांच्या व्यापारात AI वापरण्याची कला पारंगत करत आहेत.डिजिटल पाऊलखुणा न सोडणाऱ्या...

प्रधान यांच्या राजीनाम्याबद्दल पुण्यात तरुण मंडळांनी आनंदोत्सव साजरा केला पुणे बातम्या

0
पुणे : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर शनिवारी शहरात अनेक ठिकाणी जल्लोष करण्यात आला. SPPU टीचर्स असोसिएशनने शनिवारी देशभरातील आंदोलक विद्यार्थ्यांवर...

ग्राहक तक्रार पोर्टलवर गोपनीयतेची चिंता वाढवतात, FDA म्हणते डेटा सुरक्षित | पुणे बातम्या

0
तक्रार नोंदवण्यासाठी दिलेल्या त्यांच्या खाजगी तपशिलांचा गैरवापर होऊ शकतो, अशी भीती नागरिकांना वाटत आहे पुणे : अन्न आणि औषध प्रशासन (FDA) च्या ऑनलाइन...

Translate »
error: Content is protected !!