Homeताज्या बातम्यापुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे संयुक्त अधिवेशन दिमाखात संपन्न

पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे संयुक्त अधिवेशन दिमाखात संपन्न

,(मानव मित्र न्यूज प्रतिनिधी सचिन शिंदे)

पुणे : पुणे जिल्हा ग्रंथालय संघ व पुणे विभाग ग्रंथालय संघ यांचे संयुक्त अधिवेशन पत्रकार भवन, पुणे येथे मोठ्या उत्साहात व दिमाखात पार पडले. अधिवेशनाच्या प्रारंभी श्रीरामकृष्ण आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांनी नामस्मरण व भजन सादर करून उपस्थित ग्रंथालय प्रेमींना मंत्रमुग्ध केले. परंपरेप्रमाणे वारकरी दिंडीने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमुख कार्यवाह सोपानराव पवार यांनी केले.

अध्यक्ष योगेश सोमन यांनी आपल्या मनोगतात ग्रंथालय आणि साहित्य परिषद यांचे निकटचे नाते अधोरेखित करत ग्रंथपालांना न्याय मिळावा, ग्रंथालयांचा विकास व्हावा व वाचन चळवळ टिकून राहावी यासाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन दिले.

प्रसिद्ध लेखिका इंदुमती जोंधळे यांनी ग्रंथालयांना भेडसावणाऱ्या समस्यांवर भाष्य करत ग्रंथपालांना मिळणाऱ्या तुटपुंज्या मानधनावर चिंता व्यक्त केली. अनेक ग्रंथपालांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करणेही कठीण होत असून शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.                                        ‌ ‌‌

तसेच मोहन महाराज शिंदे यांनी शासनाकडून ग्रंथालयांना मिळणारे अपुरे अनुदान, जागेची अडचण, कर्मचारी पगार, वीज बिल अशा समस्यांमुळे अनेक ग्रंथालये बंद पडण्याच्या अवस्थेत असल्याचे सांगितले. ग्रामीण भागात बांधण्यात येणारी समाजमंदिरे ग्रंथालयांना नाममात्र भाड्याने उपलब्ध करून दिल्यास वाचन चळवळीला मोठी चालना मिळू शकते, अशी मागणी त्यांनी केली.

कार्यक्रमास श्रेया गोखले (ग्रंथालय अधिकारी), कुणाल टिळक (नगरसेवक), चंद्रशेखर कपोते, राजू घाटोळे, राजेंद्र ढमाले, रमेश सुतार, अरुण दांगट, हनुमंत देवकर, रजनी पाचंगे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

अधिवेशनात ग्रंथालयांच्या समस्या, वाचन संस्कृती टिकवण्याची गरज आणि शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी उपस्थित मान्यवरांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

झेड-ब्रिज महिनाभर रात्री वाहतुकीसाठी बंद राहणार आहे

0
पुणे: डेक्कन जिमखाना परिसरातील झेड-ब्रिज म्हणून प्रसिद्ध असलेला काकासाहेब गाडगीळ पूल दुरुस्तीच्या कामासाठी पुढील एक महिना रात्रीच्या वेळी (रात्री 11 ते सकाळी 7) वाहनांसाठी...

लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांसाठी 33% कोट्याचे स्वागत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मानसिकता बदलण्यावर भर दिला

0
पुणे: 2029 पासून लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांसाठी प्रस्तावित 33% आरक्षणाचे मनापासून स्वागत करण्यासाठी राजकारणातील लोकांच्या मानसिकतेत बदल करण्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी भर...

तुरुंगात असलेल्या गुंडाच्या आईला सेनेच्या कार्यकर्त्याच्या हत्येतील भूमिकेसाठी अटक, पोलिसांनी मनी ट्रेलचा हवाला दिला

0
छत्रपती संभाजीनगर: शिवसेना कार्यकर्ता अनिकेत उर्फ ​​सोनू कल्याणकर यांच्या खून प्रकरणात कटात सहभाग आणि निधी पुरवल्याप्रकरणी तुरुंगात बंद गुंड मुक्तेश्वर उर्फ ​​गोलू मंगनाळेची आई...

अभिनव कानाची शस्त्रक्रिया 23 वर्षांच्या वृद्धाला एकतर्फी बहिरेपणापासून बरे होण्यास मदत करते

0
पुणे: प्रगत कॉक्लियर ओसिया प्रणालीच्या यशस्वी रोपणानंतर पुण्यातील एका २३ वर्षीय रहिवासीने एकतर्फी ऐकण्याच्या अपंगत्वावर आणि गंभीर नैदानिक ​​उदासीनतेवर यशस्वीरित्या मात केली आहे.360-अंश ध्वनी...

सुनेत्रा यांच्या सुरक्षेची काळजी सरकार घेईल : मुख्यमंत्री

0
पुणे : ज्योतिषी अशोक खरात प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीला त्यांच्या जीवाला धोका असल्याचे पत्र मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सुरक्षेसाठी पुरेशा सुरक्षेच्या उपाययोजना...

Translate »
error: Content is protected !!