Homeताज्या बातम्यापांगारे गावात सोपानकाका पालखी सोहळ्याचे उत्साहात स्वागत; दिंडी क्र. १८ चा मुक्काम...

पांगारे गावात सोपानकाका पालखी सोहळ्याचे उत्साहात स्वागत; दिंडी क्र. १८ चा मुक्काम भक्तिमय वातावरणात संपन्न

पांगारे (ता. पुरंदर, जि. पुणे) | प्रतिनिधी अशोक कुंभार
दि. १२ जुलै २०२६ (रविवार) रोजी श्री सोपानकाका पालखी सोहळ्यानिमित्त पांगारे गावात भक्तिमय वातावरणात दिंडीचे आगमन झाले. परळी वैजनाथ पालखीच्या मागोमाग येणाऱ्या दिंडी क्रमांक १८ चे गावकऱ्यांनी उत्साहात स्वागत केले.
पांगारे येथील कुंभारवाडा परिसरात दिंडीचा मुक्काम झाला. मुक्कामादरम्यान वारकरी संप्रदायाच्या परंपरेनुसार फुगड्या, हरिनाम भजन, अभंग गायन तसेच आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. वारकरी भाविकांनी विठ्ठलनामाच्या अखंड गजरात भक्तीचा आनंद लुटला.
यावेळी दिंडीचे चालक व मालक अण्णासाहेब विष्णुदास गित्ते यांनी वारकरी संप्रदायाची परंपरा, वारीचे महत्त्व आणि समाजात भक्ती, सेवा व एकतेचा संदेश याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. उपस्थित वारकरी व ग्रामस्थांनी त्यांच्या विचारांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या दिंडीचे नाव विष्णु अण्णासाहेब गित्ते दिंडी असून दिंडीतील विविध जबाबदाऱ्या पुढीलप्रमाणे पार पाडण्यात आल्या:
दिंडी चालक व मालक – अण्णासाहेब विष्णुदास गित्ते
तुळशी वाहक – शोभाताई महादेव गित्ते
चोपदार – सुभाष कराड
हंडेवाली – मीरा कराड
वीणेकरी – रामराव मुंडे
पताका – पांडुरंग मुंडे
भजनी – अशोक मुंडे
याशिवाय विष्णु अण्णा गित्ते, मेघा महादेव चाटे, अनिल गुजराथी, त्रिशोक भोसले, बबलू भोसले, नाथराव गित्ते, गोविंद मुंडे आणि गंगाधर गित्ते यांच्यासह अनेक वारकरी आणि ग्रामस्थांनी या सोहळ्यात सक्रिय सहभाग घेतला.
भक्तिरसाने नटलेल्या या मुक्कामामुळे संपूर्ण पांगारे गाव विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमून गेले. वारकरी परंपरेतील एकात्मता, शिस्त आणि सेवाभावाचे दर्शन घडवत हा पालखी सोहळा अत्यंत आनंदी व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

CJP च्या निषेधादरम्यान जंतरमंतर येथे पोलिसांच्या अत्याचाराविरोधात पुणेकर रस्त्यावर उतरले

0
रविवारी सायंकाळी शहरातील युवक काँग्रेसच्या सदस्यांसह इतर तरुणांनी शांततापूर्ण कँडल मार्च काढला. दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज केलेल्या विद्यार्थ्यांशी एकता व्यक्त करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात...

पुण्यात लग्न लावण्यासाठी अल्पवयीन मुलीचे आधार बनवल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

0
एका अल्पवयीन मुलीने बळजबरीने केलेल्या विवाहाची तक्रार करण्यासाठी संकटात असलेल्या चाइल्ड हेल्पलाइनवर कॉल केल्याचे AI-व्युत्पन्न केलेले चित्र पुणे : एका 17 वर्षीय मुलीने...

अजितदादांच्या जयंतीनिमित्त ‘आरोग्य वारी’ला जेजुरीत भव्य स्वागत; ५०० हून अधिक धावपटूंचा सहभाग

0
या पुरंदर जेजुरी प्रतिनिधी अशोक कुंभार (दि. २६ जुलै २०२६): उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त Baramati Sports Foundation यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘आरोग्य...

रस्ता खचल्याने माळशेज घाट पुढील सूचना मिळेपर्यंत वाहतूक बंद

0
कल्याण ते अहिल्यानगर मार्गे माळशेज घाटादरम्यानची वाहतूक पुढील सूचना मिळेपर्यंत बंद करण्यात आली आहे पुणे : पुण्यापासून सुमारे 105 किमी अंतरावर असलेल्या जुन्नर...

केके मोहम्मद, कनिसेट्टी यांना सुराणा पुरस्कार पुणे बातम्या

0
पुणे: प्रख्यात पुरातत्वशास्त्रज्ञ आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) चे माजी प्रादेशिक संचालक के के मुहम्मद आणि इतिहासकार आणि लेखक अनिरुद्ध कनिसेट्टी यांना...

Translate »
error: Content is protected !!