Homeसामाजिकपत्रकारितेतील उल्लेखनीय कार्यासाठी सुनील लोणकर यांचा सासवडमध्ये गौरव

पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्यासाठी सुनील लोणकर यांचा सासवडमध्ये गौरव

(पुरंदर सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार)
सुनील पांडुरंग लोणकर यांना आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान व महाराष्ट्र साहित्य परिषद सासवड शाखेच्या संयुक्त विद्यमाने प्रतिष्ठेचा पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आला. सासवड येथील आचार्य अत्रे सभागृह, पिसर्वे रोड येथे पार पडलेल्या पाचव्या वर्षाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात हा गौरव सोहळा उत्साहात संपन्न झाला.
साहित्यिक सम्राट आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्यासोबत कार्य केलेले ज्येष्ठ पत्रकार तथा सासवडचे सुपुत्र चंद्रकांत दत्तात्रय पुरंदरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या नावाने हा पत्रकार पुरस्कार देण्यात आला. यंदाचा पुरस्कार दैनिक लोकमतचे पत्रकार आणि पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर यांना प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख उपस्थितींमध्ये सरदार कोशिक, सुनील पुरंदरे, ॲड. आरती पुरंदरे-सदावर्ते तसेच काकासाहेब पुरंदरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष उपस्थित होते. यावेळी सुनील लोणकर यांच्या मित्रपरिवारासह ग्रामस्थ, नातेवाईक तसेच सामाजिक, राजकीय, क्रीडा आणि कला क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार प्राप्त झालेल्या सुनील लोणकर यांचा खेड येथील पत्रकार बांधवांकडून सत्कार करण्यात आला.
कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, जिल्हा प्रतिनिधी अमर गायकवाड, कार्यकारिणी सदस्य रोहिदास कदम, माऊली घुंडरे व सोमनाथ बेंडाले यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी उपस्थित पत्रकार बांधवांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
उपस्थितांच्या टाळ्यांच्या गजरात आणि उत्स्फूर्त प्रतिसादात हा गौरव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाचे नियोजन शांताराम पामणे (सचिव, आचार्य अत्रे विचार मंच पुरंदर) आणि दिलीप निरगुडे (अध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद सासवड शाखा) यांनी केले. यावेळी विविध विभागांतील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सीएनजीच्या दरवाढीमुळे पुण्यात ऑटोरिक्षा संघटनांनी भाडेवाढीसाठी दबाव आणला | पुणे बातम्या

0
पुण्यातील ऑटोरिक्षांचे भाडे वाढण्याची अपेक्षा आहे पुणे : सीएनजीच्या वाढत्या किमती आणि चालकांवर आर्थिक दबाव वाढल्याने युनियन तात्काळ सुधारणा करण्यासाठी दबाव आणत असून...

मेघराज राजे भोसले यांच्या नेतृत्वाला कलाकारांचा कौल; विकासकामांची पोचपावती

0
पुणे प्रतिनिधी रोहिदास कदम)| अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत मेघराज राजे भोसले यांच्या समर्थ पॅनलने दणदणीत विजय मिळवत पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले...

झुरळ जनता पार्टी 11 जून रोजी पुण्यात आंदोलन करणार, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागणार

0
पुणे: झुरळ जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी सोमवारी जाहीर केले की, परीक्षा आणि भरती चाचण्यांमधील कथित गैरप्रकारांमुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान...

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत बिलांसाठी रयत क्रांती संघटनेचे निवेदन

0
प्रतिनिधी राहुल बोबडे छत्रपती संभाजीनगर, दि. ८ जून २०२६ : रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी तथा विभागीय साखर संकुल आयुक्त यांना निवेदन...

मान्सून जसजसा पुढे जाईल तसतसा शहरात हलका पाऊस पडेल | पुणे बातम्या

0
पुणे : IMD ने या आठवड्यात पुण्यासाठी पावसाचा अंदाज वर्तवला आहे आणि म्हटले आहे की शहरात “मुख्यतः निरभ्र आकाश, दुपारी किंवा संध्याकाळपर्यंत...

Translate »
error: Content is protected !!