आळंदी ( रोहिदास कदम ) : पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, खेड तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय आणि खेड तालुका क्रीडा शिक्षक संघटना यांच्या विद्यमाने खेड तालुका स्तरीय मैदानी स्पर्धा उत्साहात पार पडल्या. यात क्रीडा संकुल खेड येथील स्पर्धेत श्री रेणुका माध्यमिक विद्यालयातील खेळाडूंनी लक्षवेधी यश मिळवत प्रशालेचे नाव लौकिक वाढविले.
यामध्ये १४ वर्ष वयोगटात आर्या मुंगसे ( गोळा फेक प्रथम क्रमांक ), रीना कुटे ( थाळी फेक द्वितीय क्रमांक ), १७ वर्ष वयोगटात मानसी शिंदे ( उंच उडी द्वितीय क्रमांक ), १९ वर्ष वयोगट मुली
खो-खो स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळाला. यात सहभागी खेळाडू मध्ये वैष्णवी मुंगसे, समीक्षा झिंजुरके, श्रावणी चौधरी, सानिका मुंगसे, रिया कुटे, स्वरा शेलार, आर्या मुंगसे, ईश्वरी मुंगसे, प्रगती जेठे, रिना कुटे, अन्विता थोरात, संस्कृती सावरतकर, संचिता मुंगसे, श्रावणी कुटे यांचा समावेश होता.
यात झालेल्या कुस्ती स्पर्धेत ६२ किलो वजन गटात कु. सृष्टी रेडेकर द्वितीय क्रमांक, ४५ किलो वजन गटात संस्कार कड तृतीय क्रमांक, ५५ किलो वजन गटात तेजस मुंगसे तृतीय क्रमांक, ६५ किलो वजन गटात मयूर लोखंडे तृतीय क्रमांक पटकावला.
मैदानी स्पर्धेतील सर्व खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सर्व खेळाडूंना मार्गदर्शन क्रीडा शिक्षक संतोष काळे, वसंत मुंगसे यांनी केले. विजेत्या खेळाडूंचे व मार्गदर्शक शिक्षकांचे बापदेव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विजय शिंदे, सचिव दिपक मुंगसे, उपाध्यक्ष वामन मुंगसे, संचालक जगन्नाथ शिंदे, किसन शिंदे, सोपान मुंगसे, रामचंद्र शिंदे, सुवर्णा वाडेकर, स्वाती शिंदे, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुवर्णा बोऱ्हाडे, शिक्षक संजीव भोर, संजयकुमार पिचके, कल्पना गायकवाड, अंजली झिंजुरके, शिक्षक पालक संघाचे सर्व पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी ,पालक, माजी विद्यार्थी, रासे ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























