आळंदी (सचिन शिंदे ) अभिराज फाउंडेशन, वाकड येथील दिव्यांग मुलांच्या शाळेत ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन, पुणे तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी संस्थेचे संचालक डॉ. योगेश सामनेकर, डॉ. सुनिता सामनेकर, संजय मुळे, भारती वाणी, आणि सविता मॅडम उपस्थित होते. शाळेतील विद्यार्थ्यांनी या फाउंडेशनचे स्वागत वृक्ष भेट देऊन सन्मानित केले. 
वाटपाचे नियोजन विकास जगताप, योगेश आढाळे, ऋषिकेश मुसुडगे, आणि विनायक जुनावणे यांनी केले, तर सूत्रसंचालन अंजना चिगरे यांनी केले. या वेळी शाळेचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारीही उपस्थित होते. समारोपाच्या वेळी मुलांना खाऊ वाटप केले गेले.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























