आळंदी/( रवि कदम ) ; येथील पुणे जिल्हा परिषद कडाची वाडी प्राथमिक विद्या मंदिर शाळेत ओळख हरिपाठाची उपक्रमास हरिनाम गजरात प्रारंभ करण्यात आला. यावेळी संत साहित्य प्रशालेस आणि मुलांना हरिपाठाचे वाटप उत्साहात करण्यात आले. या प्रसंगी व्यासपीठावर इंद्रायणी शिक्षण संस्था अध्यक्ष तुकाराम अण्णा गवारे , माजी मुख्याध्यापिका संगीता वाघमारे, अद्वैत डेव्हलपर्स रोहिणी कड, ओळख श्री ज्ञानेश्वरी परिवार सदस्य विश्वंभर पाटील, विलास वाघमारे, सोपानकाका काळे, अर्जुन मेदनकर, काळुराम येळवंडे, मुख्याध्यापिका नयना पाटील, निवृती भुकन, गणेश सटाले, वसंतराव कड, तंटा मुक्ती समिती अध्यक्ष दत्तात्रय खांडेभराड यांचेसह शिक्षक, पालक आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी रोहिणी कड, संगीता वाघमारे, तुकाराम अण्णा गवारे, काळुराम येळवंडे आदींनी मुलांना मार्गदर्शन करीत मुल्यसंवर्धन उपक्रमा विषयी माहिती दिली. मनोगत व्यक्त करीत मुलांशी मान्यवरांनी संवाद साधत मुल्य शिक्षण काळाची गरज असल्याचे सांगत संवाद साधला. माजी मुख्याध्यापिका रोहिणी कड यांनी बक्षिसे वाटप केले जाईल असे सांगत मुलांना अधिक प्रेरणा देण्यात येईल असे सांगितले. या साठी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.
गीता, हरिपाठ पाठ, श्री ज्ञानेश्वरी तील एक तरी ओवी अनुभवावी यासाठी शालेय मुलांना मार्गदर्शन करीत उपक्रमात सातत्य ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. वर्षा अखेर मुलांचे संत साहित्यावर आधारित परीक्षा घेऊन प्रथम १० क्रमांक प्राप्त मुलांस बक्षिसे देण्यात येतील असे तुकाराम अण्णा गवारे यांनी भूमिका जाहीर केली. शालेय मुलासाठी सुरू केलेला प्रेरणादायी उपक्रम शाळेत सतत चालू राहील असे यावेळी प्रशालेने जाहीर केले. गणेश सटाले यांनी आभार मानले. पसायदान गायनाने उपक्रमाची हरी नाम जयघोषात सांगता झाली.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम























