(सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार)
सासवड (दि.12 ऑक्टोबर 2025) –
उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमे अंतर्गत ग्रामीण रुग्णालय सासवड यांच्या माध्यमातून एकूण 3856 बालकांना पोलिओ लस देण्यात आली.
मोहिमेचे उद्घाटन ग्रामीण रुग्णालय सासवडचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गजानन अकमार सर यांच्या हस्ते करण्यात आले. या मोहिमेसाठी रुग्णालयाचे एकूण 22 बूथ कार्यरत होते, ज्यामध्ये 0 ते 5 वयोगटातील बालकांना लसीकरण करण्यात आले.
या उपक्रमात मीरा नर्सिंग होम, स्वामी समर्थ मंडळ तसेच ग्रामीण रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
लसीकरण मोहिमेचा पुढील टप्पा म्हणून 13 ते 17 ऑक्टोबर 2025 दरम्यान घर भेटींसाठी 18 टीम तैनात करण्यात आल्या आहेत.
या माध्यमातून 100% लसीकरण पूर्ण करण्याचे आव्हान डॉ. अकमार सर यांनी व्यक्त५६ केले.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























