
पुणे प्रतिनिधी (अशोक ज. कुंभार) काकडेदेशमुख शिक्षण संस्थेच्या उत्कर्ष साहित्य साधना राष्ट्रीय मंच सुखसागर, कात्रज येथे नऊ रणरागिणींचा भव्य सत्कार सोहळा पार पडला.
साहित्य आणि कलेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या रणरागिणींना उत्कर्ष रणरागिणी पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
याच कार्यक्रमात प्रा. शरदचंद्र काकडेदेशमुख यांच्या “फाशी” या बळीराजाच्या जीवनावर आधारित काव्यसंग्रहाचे प्रकाशनही करण्यात आले.
या प्रसंगी वसुधाताई नाईक, मा. विवेक क्षीरसागर, मा. कल्याण राऊत, मा. केशव काकडे, श्री. शैल सुतार, सौ. स्मिता काकडे, विलास बाबर, मा. भगवानसिंह राठोड, परिक्षक विजय सातपुते, प्रिया दामले आणि अनोखी स्वराच्या माधवीताई इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारिका सासवडे आणि दीपक पांढरे यांनी केले, तर आभारप्रदर्शन ॲड. सुवर्णा बाबर यांनी मानले.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम























