Homeताज्या बातम्याआळंदी नगरपरिषदेतील सार्वत्रिक निवडणुकी २०२५ ‌संदर्भात निवडणूकअधिकारी पोलिसांनी उत्सुकउमेदवारांना मार्गदर्शन

आळंदी नगरपरिषदेतील सार्वत्रिक निवडणुकी २०२५ ‌संदर्भात निवडणूकअधिकारी पोलिसांनी उत्सुकउमेदवारांना मार्गदर्शन

आळंदी (प्रतिनिधी.रवि कदम ) – आगामी आळंदी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 पारदर्शक व शांततेत पार पडावी यासाठी आज दिनांक 7 नोव्हेंबर 2025 रोजी आळंदी नगरपरिषदेत निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन बैठक आयोजित करण्यात आली.

या बैठकीस निवडणूक निर्णय अधिकारी श्री. जयराज देशमुख, मुख्याधिकारी खांडेकर साहेब, आळंदी पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्री भीमराव.नरके, दिघी पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रमोद वाघ, तसेच वाहतूक पोलीस निरीक्षक चव्हाण उपस्थित होते. या अधिकाऱ्यांनी उपस्थित उमेदवार, नगराध्यक्ष पदाचे इच्छुक तसेच नागरिकांना आदर्श आचारसंहितेचे नियम, फॉर्म भरण्याची प्रक्रिया व प्रचाराच्या मर्यादा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

नरके साहेब यांनी सांगितले की, उमेदवार व कार्यकर्त्यांकडे परवानाधारक शस्त्र असल्यास ती निवडणुकीच्या कालावधीत संबंधित पोलीस ठाण्यात जमा करावी. प्रचार सकाळी 9 ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत करण्यास परवानगी आहे. मतदान केंद्रापासून 100 फुटाच्या अंतरावर केवळ 10×10 फूट आकाराचा मंडप ठेवता येईल, आणि त्यात फक्त चार कार्यकर्ते उपस्थित राहू शकतील.

निवडणुकीदरम्यान बाहेरगावहून येणारे नातेवाईक किंवा मित्रमंडळी मतदान केंद्राजवळ आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मिरवणुकीच्या वेळी दोन पक्षांचे जथ्थे एकमेकांसमोर येणार नाहीत याची दक्षता घ्यावी, तसेच बॅनर, पोस्टर यासाठी नगरपरिषदेची परवानगी घेणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.

सभांसाठी धर्मशाळा किंवा खुले मैदान यांसारखी ठिकाणे वापरावीत; चौक, ट्रॅफिक पॉइंट येथे सभा घेण्यास बंदी राहील. नगराध्यक्ष उमेदवाराला दहा वाहनांची परवानगी असून खर्च मर्यादा सात लाख रुपये, तर नगरसेवक उमेदवाराला दोन लाख रुपये इतकी आहे. रोजचा खर्च नोंदवणे बंधनकारक राहील, व 50,000 रुपयांहून अधिक रक्कम सापडल्यास संबंधितांना व्यक्ती चौकशी केली जाईल.

निवडणूक प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पार पडणार असून उमेदवारांना संबंधित लिंक पाठवण्यात येईल. फॉर्म दाखल करताना पाच जणांपर्यंतच संगत ठेवता येईल. शक्ती प्रदर्शनाची मर्यादा 200 फूट लांब असावे.

अर्ज दाखल करण्याची सुरुवात – 10 नोव्हेंबर,

अंतिम तारीख – 17 नोव्हेंबर (सायं 3 वाजेपर्यंत),

अर्ज छाननी – 18 नोव्हेंबर,

अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख – 25 नोव्हेंबर,

मतदान – 2 डिसेंबर,

मतमोजणी – 3 डिसेंबर अशी निवडणूक कार्यक्रमाची रूपरेषा जाहीर करण्यात आली.

नगराध्यक्ष उमेदवारांना डिपॉझिट स्वरूपात  ₹1000, तर नगरसेवक उमेदवारांना ₹500 इतकी ठेव रक्कम जमा करावी लागणार आहे. निवडणूक आयोगाने सर्व उमेदवारांना आदर्श आचारसंहिता पाळत शांततेत आणि प्रामाणिकपणे निवडणूक लढवावी असे आवाहन केले.

अधिकाऱ्यांनी शेवटी सांगितले की, उमेदवारांच्या जात पडताळणी प्रक्रियेसाठी प्रशासन पूर्ण सहकार्य करेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘उलट लटकले, मला उपाशी ठेवले’: नोकरीच्या जाहिरातीच्या जाळ्यात पुण्याचा माणूस म्यानमारमधील सायबर गुलामगिरीतून कसा...

0
AI-व्युत्पन्न केलेली प्रतिमा प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली जाते. पुणे : दोन महिने बंदिवासात राहिल्यानंतर साहिलने लढाईसाठी स्वत:ला तयार केले. एक दिवस आधी त्याने आपल्या...

हुच कारखाने कायमस्वरूपी बंद करण्यासाठी कठोर कारवाई करावी : आठवले

0
पुणे : बेकायदेशीर हुच निर्मिती युनिट्स कायमस्वरूपी नष्ट करण्यासाठी कठोर उपाययोजनांची गरज असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी...

इंद्रायणी नदीच्या अपघातात वेगवेगळ्या ठिकाणी तिघांचा बुडून मृत्यू

0
पुणे : इंद्रायणी नदीत शनिवार आणि रविवार दरम्यान शिरगाव, कुंड माळा आणि देहूजवळील वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन जण बुडाले, अशी माहिती पोलिसांनी दिली.पहिल्या...

शेतकऱ्याची २ लाख रुपयांची फसवणूक करण्यासाठी चोरीला गेलेला फोन

0
पुणे : थेऊर येथील नायगाव फाट्याजवळ उभ्या असलेल्या वाहनातून मोबाईल फोन चोरणाऱ्या अज्ञात चोरट्यांचा लोणी काळभोर पोलीस शोध घेत आहेत आणि नंतर...

एअर इंडिया एक्स्प्रेसच्या 2 फ्लाइटला 7 तास उशीर झाल्याने 200 हून अधिक प्रवाशांना त्रास...

0
एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान पुणे : एअर इंडिया एक्स्प्रेसच्या दोन स्वतंत्र उड्डाणे IX-2913 आणि IX-1098 - शनिवार आणि रविवारच्या मध्यरात्री सात तासांपेक्षा जास्त...

Translate »
error: Content is protected !!