Homeताज्या बातम्याअपघातग्रस्त वारकऱ्यांच्या वारसांना १५ लाखांची नुकसानभरपाई द्या; अखिल भारत हिंदू महासभेची मुख्यमंत्र्यांकडे...

अपघातग्रस्त वारकऱ्यांच्या वारसांना १५ लाखांची नुकसानभरपाई द्या; अखिल भारत हिंदू महासभेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

आळंदी |संपादक रोहिदास कदम
संत ज्ञानेश्वर महाराज पायी वारी पालखी सोहळ्यात घडलेल्या दुर्दैवी अपघातात तीन वारकऱ्यांचा मृत्यू, तर सात वारकरी जखमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी १५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी अखिल भारत हिंदू महासभेने केली आहे. या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
पंढरपूरकडे मार्गस्थ असलेल्या पायी वारीतील दिंडीवर ट्रकने धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत तीन निष्पाप वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण वारकरी संप्रदायासह हिंदू समाजात शोककळा पसरली आहे.
अखिल भारत हिंदू महासभेचे वरिष्ठ राष्ट्रीय उपाध्यक्ष वैभवराज रौंधळ आणि पुणे जिल्हाध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्राताई पवार, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, पालखी सोहळा प्रमुख राजेंद्र उमाप तसेच पालखी सोहळा मालक राजेंद्र आरफळकर यांना निवेदन देऊन पीडित वारकरी कुटुंबांना तातडीने भरीव मदत करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मृत वारकरी हे सामान्य कुटुंबातील असून अत्यंत श्रद्धा आणि भक्तिभावाने वारीत सहभागी झाले होते. या अपघातामुळे त्यांच्या कुटुंबांचा आधार हिरावला गेला असून त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अशा परिस्थितीत शासन आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून पीडित कुटुंबांना तातडीने मदत करावी.
प्रमुख मागण्या
मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी १५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करावी.
प्रत्येक मृत वारकऱ्याच्या कुटुंबातील एका सदस्यास शासकीय नोकरी द्यावी.
जखमी सात वारकऱ्यांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च शासनाने उचलावा.
उपचारानंतर पुढील सहा महिन्यांचा खर्च श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी यांनी करावा.
वारी मार्गावरील पोलीस बंदोबस्त आणि वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावी करून वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात.
या मागणीस अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय संरक्षक श्री श्री १००८ जगद्गुरु स्वामी माधवानंद सरस्वतीजी महाराज, राष्ट्रीय धर्मप्रचारक श्रीमंत शिवनाथजी महाराज, योगी आनंद दादानाथजी, बालयोगी ऋषिकेशनाथजी, मोहन सदचिदानंदजी सरस्वती, महंत योगानंद सरस्वती, महंत केशवानंद सरस्वती, राष्ट्रीय कार्याध्यक्ष योगेंद्र वर्मा आणि राष्ट्रीय महामंत्री डॉ. सिद्धार्थ भट्टाचार्य यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे.
दरम्यान, या प्रकरणाची शासनाने तातडीने दखल घेऊन पीडित कुटुंबांना न्याय द्यावा, अन्यथा अखिल भारत हिंदू महासभेच्या वतीने सनदशीर मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

CJP च्या निषेधादरम्यान जंतरमंतर येथे पोलिसांच्या अत्याचाराविरोधात पुणेकर रस्त्यावर उतरले

0
रविवारी सायंकाळी शहरातील युवक काँग्रेसच्या सदस्यांसह इतर तरुणांनी शांततापूर्ण कँडल मार्च काढला. दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज केलेल्या विद्यार्थ्यांशी एकता व्यक्त करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात...

पुण्यात लग्न लावण्यासाठी अल्पवयीन मुलीचे आधार बनवल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

0
एका अल्पवयीन मुलीने बळजबरीने केलेल्या विवाहाची तक्रार करण्यासाठी संकटात असलेल्या चाइल्ड हेल्पलाइनवर कॉल केल्याचे AI-व्युत्पन्न केलेले चित्र पुणे : एका 17 वर्षीय मुलीने...

अजितदादांच्या जयंतीनिमित्त ‘आरोग्य वारी’ला जेजुरीत भव्य स्वागत; ५०० हून अधिक धावपटूंचा सहभाग

0
या पुरंदर जेजुरी प्रतिनिधी अशोक कुंभार (दि. २६ जुलै २०२६): उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त Baramati Sports Foundation यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘आरोग्य...

रस्ता खचल्याने माळशेज घाट पुढील सूचना मिळेपर्यंत वाहतूक बंद

0
कल्याण ते अहिल्यानगर मार्गे माळशेज घाटादरम्यानची वाहतूक पुढील सूचना मिळेपर्यंत बंद करण्यात आली आहे पुणे : पुण्यापासून सुमारे 105 किमी अंतरावर असलेल्या जुन्नर...

केके मोहम्मद, कनिसेट्टी यांना सुराणा पुरस्कार पुणे बातम्या

0
पुणे: प्रख्यात पुरातत्वशास्त्रज्ञ आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) चे माजी प्रादेशिक संचालक के के मुहम्मद आणि इतिहासकार आणि लेखक अनिरुद्ध कनिसेट्टी यांना...

Translate »
error: Content is protected !!