Homeताज्या बातम्यासासवड–कापूरहोळ मार्गावर प्रवाशांची मोठी गैरसोय; एसटी बस थांबत नाहीत, नागरिकांची तीव्र नाराजी!

सासवड–कापूरहोळ मार्गावर प्रवाशांची मोठी गैरसोय; एसटी बस थांबत नाहीत, नागरिकांची तीव्र नाराजी!

सासवड (पुरंदर, पुणे): सासवड एसटी आगारातून जेजुरी, नारायणपूर, चिरेवाडी घाट, बालाजी मंदिर आणि कापूरहोळ मार्गावर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ असतानाही एसटी बसेस थांबत नसल्याची गंभीर तक्रार नागरिकांनी केली आहे.
विशेषतः पुणे–कापूरहोळ–सातारा–सांगली–कोल्हापूर या मार्गावर प्रवासी मोठ्या प्रमाणात असतानाही वाई, महाबळेश्वर, वडूज, कोरेगाव, फलटण, कराड येथून जाणाऱ्या बस थांबत नाहीत, अशी नागरिकांची नाराजी आहे.
मंदिरदर्शनासाठी येणारे भाविक, कामानिमित्त येणारे नागरिक तसेच विद्यार्थी यांना खाजगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत असून दुप्पट पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे प्रवाशांचे आर्थिक नुकसान होत असून महामंडळाचेही मोठे उत्पन्न खाजगी वाहनांकडे जात असल्याची स्थानिकांची तक्रार आहे.
प्रवाशांचे म्हणणे आहे की,
एसटी बसचालकांनी आणि कर्मचाऱ्यांनी किमान गर्दीच्या ठिकाणी बस थांबवावी, प्रवासी घेतले पाहिजेत, आणि आवश्यकतेनुसार बसेसची संख्या वाढवावी.
नागरिकांची ठाम मागणी:
➡ तात्काळ बस थांबे वाढवावेत
➡ गर्दीच्या वेळेस प्रवाशांना बसमध्ये घेतले पाहिजे
➡ सातारा विभागाच्या बस थांबवण्याबाबत आदेश द्यावेत
➡ खाजगी वाहनांकडून होणारे प्रवाशांचे आर्थिक शोषण थांबवावे
नागरिकांनी सासवड एसटी आगारातील अधिकाऱ्यांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गुरुपौर्णिमेनिमित्त मातोश्री चंद्रभागा आश्रमात भक्तिमय वातावरणात गुरुपूजन व कीर्तन सोहळा संपन्न

0
अंबाजोगाई, प्रतिनिधी (मेघा चाटे) : परळी वैजनाथ तालुक्यातील मातोश्री चंद्रभागा आश्रम, वैद्यनाथ मंदिराच्या पूर्वेस तुकाई रोड येथे परमपूज्य वै. ह. भ. प. गुरुवर्य मृदंड...

आंबेजोगाई येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन

0
आंबेजोगाई येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन केज (प्रतिनिधी – मेघा चाटे | मानव मित्र न्यूज): छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर...

‘हे आमचे मंदिर आहे’: दिल्लीतील पर्यटकांना महाराष्ट्राच्या लोहगड किल्ल्यावर धुम्रपान करण्यासाठी स्थानिकाने शिकविले

0
पुणे: महाराष्ट्राच्या ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावरील व्हायरल झालेल्या व्हिडिओने संरक्षित वारसा स्थळांवर पर्यटकांच्या वर्तनावर पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे.या क्लिपमध्ये किल्ल्याच्या तटबंदीवर...

मी पायउतार होण्यापूर्वी सर्व मुद्दे निकाली काढले होते: माजी डीएलटीए प्रमुख अनिल खन्ना

0
पुणे: ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (AITA) तसेच दिल्ली लॉन टेनिस असोसिएशन (DLTA) चे माजी अध्यक्ष अनिल खन्ना यांनी बुधवारी सांगितले की, DLTA...

कॅश फॉर डिग्री घोटाळ्याप्रकरणी एसपीपीयूने पोलिसात तक्रार दाखल केली, कर्मचाऱ्याला निलंबित केले | पुणे...

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी प्रमाणपत्राच्या कथित रोख रकमेप्रकरणी बुधवारी पोलिसात तक्रार दाखल केली, ज्यामध्ये विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यावर...

Translate »
error: Content is protected !!