- सासवड (ता. पुरंदर, जि. पुणे) प्रतिनिधी अशोक कुंभार: प्रवाशांना सुलभ, पारदर्शक आणि रोखरहित प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्या वतीने सासवड आगारात NCMC (National Common Mobility Card) वाटपाचा शुभारंभ करण्यात आला.
बुधवार दिनांक 08 एप्रिल 2026 रोजी स्थानक प्रमुख श्रीमती मोहिनी ढेरे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
प्रवाशांना सवलतींचा लाभ मिळावा तसेच तिकीट व्यवस्थेत पारदर्शकता यावी यासाठी NCMC कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग, पत्रकार व स्वातंत्र्यसैनिक यांसारख्या प्रवाशांसाठी हे कार्ड उपयुक्त ठरणार आहे.
सासवड बसस्थानकात अधिकृत टेंडरधारक श्री सारंग लोणकर यांच्या माध्यमातून प्रवाशांसाठी NCMC कार्ड सेवा सुरू करण्यात आली आहे. पुणे विभागात सासवड येथे मोठ्या प्रमाणात कार्ड नोंदणी झाल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमावेळी आगारातील वरिष्ठ लिपिक श्री अमित वाल्मिक, वाहतूक नियंत्रक श्री कैलास जगताप, श्री पोपट जेधे, श्री प्रवीण गायकर, श्री रामचंद्र गवाडे, श्री महेश भोंगळे आदी उपस्थित होते.
या कार्डमुळे प्रवाशांना —
✅ रोखरहित (Cashless) प्रवास
✅ सुलभ तिकीट प्रक्रिया
✅ सवलतींची अचूक नोंद
✅ वन नेशन – वन कार्ड सुविधा
यांचा लाभ मिळणार असून भविष्यात इतर मेट्रो व बस सेवांमध्येही हे कार्ड उपयुक्त ठरणार आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम





















