सासवड( प्रतिनिधी अशोक कुंभार ) महाराष्ट्रावर शोककळा; बारामतीत लँडिंगच्या वेळी लिअरजेट विमानाचा अपघात, उद्या विद्या प्रतिष्ठान मैदानावर अंतिम संस्कार
महाराष्ट्रासाठी आजचा दिवस अत्यंत वेदनादायी आणि काळा दिवस ठरला असून संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे.
वृत्तानुसार, मुंबईहून बारामतीकडे येत असलेल्या लिअरजेट (Learjet 45) विमानाचा बारामती विमानतळावर लँडिंगच्या वेळी भीषण अपघात झाला.
जिल्हा परिषदेच्या प्रचाराच्या निमित्ताने मुंबईवरून बारामती येथे येत असताना हे विमान लँडिंगसाठी धावपट्टीवर उतरण्याचा प्रयत्न करत होते. मात्र अंतिम टप्प्यात अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने विमानाचा तोल गेला आणि ते रनवेवरून घसरत जाऊन ज्वाळांमध्ये कोसळले. अपघातानंतर काही क्षणांतच विमानाला भीषण आग लागली.
या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात शोकाचे वातावरण पसरले आहे.
माहितीनुसार, उद्या सकाळी ११ वाजता विद्या प्रतिष्ठान मैदान, बारामती येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. त्याआधी त्यांचे पार्थिव मूळ गाव काटेवाडी येथे नागरिकांच्या अंतिम दर्शनासाठी नेण्यात येणार असल्याचे समजते.
या दुःखद घटनेनंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवार कुटुंबीयांशी दूरध्वनीवरून संपर्क साधत शोकसंवेदना व्यक्त केल्याची माहिती आहे. देशभरातून तसेच राज्यातील विविध राजकीय, सामाजिक नेत्यांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
दरम्यान, बारामती शहरासह परिसरातील अनेक भागांत स्वयंस्फूर्त बंद पाळण्यात येत असून सर्वत्र शांतता आणि शोकाचे वातावरण आहे. दुकाने, बाजारपेठा बंद असून नागरिक मोठ्या संख्येने श्रद्धांजली वाहण्यासाठी एकत्र येत आहेत.
आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अत्यंत वेदनादायी ठरला असून संपूर्ण राज्य दुःखाच्या सावटाखाली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अपघाताच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे. .

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























