Homeताज्या बातम्याबोगस दस्त करणा-यावर कारवाई करा — पुरोगामी संघर्ष परिषदेची मागणी ; आंदोलनाचा...

बोगस दस्त करणा-यावर कारवाई करा — पुरोगामी संघर्ष परिषदेची मागणी ; आंदोलनाचा दुसरा दिवस, प्रशासनाचे दुर्लक्ष

पुरंदर (प्रतिनिधीअशोक कुंभार)

दुय्यम निबंधक तथा सब-रजिस्टर कार्यालयात होत असलेल्या बोगस दस्तांची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, या प्रमुख मागणीसह विविध जनहिताच्या मुद्द्यांसाठी पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने सोमवार, दि. ३ नोव्हेंबर २०२५ पासून उपविभागीय अधिकारी तथा प्रांत पुरंदर यांच्या कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू आहे.

या आंदोलनाचा आज दुसरा दिवस असून, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अजूनही आंदोलनाची दखल न घेतल्याने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

संघर्ष परिषदेच्या मुख्य मागण्या:

बोगस दस्तांवर चौकशी करून दोषींवर कारवाई करावी.

अवैध धंद्यांना पाठीशी घालणाऱ्या जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपक वाघचौरे यांची तात्काळ बदली करावी.

ग्राहकांच्या परवानगीशिवाय स्मार्ट मीटर बसवू नयेत.

अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील नागरिकांचे दाखले व सर्कल पंचनामे तातडीने करून द्यावेत.

तहसिल व प्रांत कार्यालयात प्रलंबित महसुली खटल्यांचा निकाल त्वरित द्यावा.

भूमी अभिलेख कार्यालयात पावती न देता चारपट पैसे घेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी.

शेतकऱ्यांच्या कमी क्षेत्राची देखील मोजणी करावी.

नेतृत्व आणि उपस्थिती:

या आंदोलनाचे नेतृत्व राज्याचे युवक अध्यक्ष मनोज भिसे यांनी केले.

आंदोलनाची सुरुवात संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रा. सुभाष वायदंडे यांच्या आदेशानुसार,

ज्येष्ठ नेते पंढरीनाथ आढागळे सर आणि जिल्हा अध्यक्ष गोकुळ भिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.

या प्रसंगी आंदोलनास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), श्रमिक ब्रिगेड, बहुजन हक्क परिषद, तसेच अनेक सामाजिक संघटनांचा पाठिंबा लाभला.

विशेषतः विष्णूदादा भोसले, सुधीर शेलार, सुनिलतात्या धिवार, बदाम आण्णा माकर, महादेव खेंगरे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रशासनाला इशारा:

आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की, “मा. प्रांत अधिकारी मॅडम यांनी सर्व शासकीय विभाग प्रमुखांची बैठक बोलवावी आणि संघर्ष परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी निमंत्रण द्यावे. अन्यथा आंदोलनाची तीव्रता वाढवली जाईल.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘कोठडीतील कबुलीजबाब पुरावा म्हणून मान्य नाही’: केतन अग्रवाल खून प्रकरणात सिया गोयलचे वकील

0
पुणे : केतन अग्रवाल खून खटल्यातील आरोपी सिया गोयलच्या वकिलांनी रविवारी असा युक्तिवाद केला की, पोलिस कोठडीत असताना दिलेली कोणतीही कबुली पुरावा...

केतन अग्रवालच्या मृत्यूनंतर आठवड्यांनंतर, सिया गोयल, ‘प्रेयसी’ चेतन चौधरी गुन्हेगारीचे दृश्य पुन्हा तयार करण्यासाठी...

0
पुणे पोलिसांनी लोहगड किल्ल्यावरील गुन्हेगारीचे दृश्य पुन्हा तयार केले आणि आरोपी सिया गोयलला तिची मंगेतर, रिअल्टर केतन अग्रवालची हत्या केल्याच्या ठिकाणी नेले. पुणे:...

केतन अग्रवाल खून प्रकरण: सिया गोयल, तिचा ‘प्रेयसी’ चेतनने ‘गुन्ह्यापूर्वी अनेक तालीम’ केली; मे...

0
26 वर्षीय रिअल्टर केतन अग्रवालच्या हत्येच्या तपासात असे दिसून आले आहे की दोन आरोपींनी हत्येपूर्वी गुन्ह्याची अनेक वेळा तालीम केली होती, असे पोलिसांनी...

‘मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी’: केतन अग्रवालच्या कुटुंबीयांसह स्थानिकांचा पुण्यात कँडल मार्च; पहा | पुणे...

0
केतनचे कुटुंबीय आणि सोसायटीचे रहिवासी त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी जमले होते, ज्याचा सध्या पोलिस तपास...

महाराष्ट्र खाजगी कंपन्यांच्या वार्षिक ऑडिट दरम्यान पॉश कायद्याचे पालन बंधनकारक करणार आहे

0
पुणे : कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, प्रतिबंध आणि निवारण) कायदा, 2013 (पॉश कायदा) ची अंमलबजावणी मजबूत करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने...

Translate »
error: Content is protected !!