Homeताज्या बातम्यापहाटेच्या काळोखात भीषण दुर्घटना! दरड कोसळून गोशाळेवर संकट; एकूण बारा गायींचा मृत्यू

पहाटेच्या काळोखात भीषण दुर्घटना! दरड कोसळून गोशाळेवर संकट; एकूण बारा गायींचा मृत्यू

पोमगाव (ता. मुळशी, जि. पुणे) | मानव मित्र न्यूज
मुसळधार पावसाने पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात मोठी दुर्घटना घडवली आहे. पोमगाव (गुरववाडी) येथील श्री जगद्गुरु प्रतिष्ठान संचलित श्री राधा चैतन्य गोशाळेवर मंगळवारी पहाटे सुमारे ३.३० वाजण्याच्या सुमारास डोंगराचा मोठा भाग खचून दरड कोसळली. या भीषण दुर्घटनेत ५ ते ६ गायींचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ५ ते ६ गायी गंभीर जखमी झाल्या आहेत.
या गोशाळेत सुमारे १५० भाकड गायींचे संगोपन केले जाते. सलग सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे डोंगराची माती सैल झाली आणि अचानक मोठी दरड गोशाळेवर कोसळली. काही क्षणांतच गोशाळेचा परिसर माती व दगडांच्या ढिगाऱ्याखाली गेला. गायींचा आक्रोश ऐकून स्थानिक ग्रामस्थ, स्वयंसेवक आणि गोसेवक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य सुरू करण्यात आले.
गोशाळेचे संस्थापक-अध्यक्ष गोसेवक सचिन महाराज गुरव तसेच भागवताचार्य ह.भ.प. सौ. अंजलीताई सचिन गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली ही गोशाळा कार्यरत आहे. दुर्घटनेनंतर जखमी गायींवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले असून त्यांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच गावचे तलाठी आणि ग्रामसेवक यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. दरड कोसळल्यामुळे गोशाळेचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून उर्वरित जनावरांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर डोंगराळ भागातील गोशाळा, शेतवस्त्या आणि घरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने तातडीने नुकसानग्रस्त गोशाळेला आर्थिक मदत द्यावी, तसेच अशा ठिकाणांचे सर्वेक्षण करून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; पाणी साचले, वाहतूक कोंडी शहर ठप्प; पूरग्रस्त भागातून ४९२ कुटुंबांचे...

0
मुसळधार पावसामुळे पुण्यात पाणी साचले आणि वाहतूक विस्कळीत झाली. पुणे: पुणे महानगरपालिकेच्या (पीएमसी) मान्सूनपूर्व तयारीमधील उणिवा उघड करत, मोठ्या प्रमाणावर पाणी साचणे, वाहतूक...

शेतकरी कर्जमाफीबाबत सरकार गंभीर नाही, विरोधाचा इशारा

0
एमपीसीसी प्रमुख हर्षवर्धन सपकाळ पुणे : एमव्हीए सदस्य आणि शेतकरी कार्यकर्त्यांनी शेततळ्यांच्या दुर्दशेवर राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला. शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत दिरंगाई करून...

वायू आणि जलप्रदूषणावर एमपीसीबीने बारामती ॲग्रोला पाठवली नोटीस | पुणे बातम्या

0
पुणे : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) मंगळवारी राष्ट्रवादीचे (SP) आमदार रोहित पवार यांच्याशी संबंधित असलेल्या बारामती ॲग्रो शुगर अँड डिस्टिलरी युनिटला...

भाजप आमदार मुळशी धरणाच्या पाण्याचा शहरासाठी वापर करणार, मंत्री म्हणतात या आठवड्यात बैठक

0
पुणे जिल्ह्यातील मुळशी धरणाचे बॅकवॉटर पुणे : मुळशी धरणाचे पाणी पुणे शहरासाठी मिळावे, असा प्रलंबित प्रस्ताव दौंडचे भाजप आमदार राहुल कूल यांनी बुधवारी...

तीर्थापुरी परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; शेळीवर हल्ला करून फस्त, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

0
प्रतिनिधी : राहुल बोबडे तीर्थापुरी, दि. ९ जुलै : तीर्थापुरी परिसरात बिबट्याचा वाढता वावर नागरिकांसाठी आणि पशुपालकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. परिसरातील रेखाबाई बिरबल सिंग...

Translate »
error: Content is protected !!