Homeताज्या बातम्याजागतिक पर्यावरण दिन येरवडा कारागृहात ११ हजार वृक्षांची लागवड; घनदाट नागरी वन...

जागतिक पर्यावरण दिन येरवडा कारागृहात ११ हजार वृक्षांची लागवड; घनदाट नागरी वन उभारणीला सुरुवात

पुणे सासवड| प्रतिनिधी अशोक कुंभार
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कारागृह विभाग आणि रोटरी क्लब ऑफ पुणे टिळक रोड यांच्या संयुक्त विद्यमाने येरवडा कारागृह परिसरात ११ हजार वृक्षांची लागवड करून घनदाट नागरी वन (डेन्स अर्बन फॉरेस्ट) निर्माण करण्याच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला प्रारंभ करण्यात आला.
या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी कारागृह विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ. सुहास वारके (आयपीएस), म्युनिशन्स इंडिया लिमिटेडचे मानव संसाधन संचालक नंदकिशोर नाईक, रोटरी प्रांत ३१३१ चे प्रांतपाल संतोष मराठे, रोटरी क्लब ऑफ पुणे टिळक रोडचे अध्यक्ष देवदत्त हंबर्डीकर, कारागृह प्रशासनाचे अधिकारी शामकांत शेडगे, रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ चे पर्यावरण संचालक राजेंद्रकुमार सराफ तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.
वाढते शहरीकरण, प्रदूषण आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. येरवडा खुल्या कारागृहाच्या परिसरातील सुमारे एक एकर जागेवर घनदाट नागरी वन विकसित करण्यात येणार असून, यामुळे शहरातील हरित क्षेत्रात मोठी भर पडणार आहे.
घनदाट नागरी वनामुळे हवेची गुणवत्ता सुधारण्यास, कार्बन शोषण क्षमता वाढविण्यास, जैवविविधतेचे संवर्धन करण्यास आणि पर्यावरणीय संतुलन राखण्यास मदत होणार आहे. पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वपूर्ण पाऊल मानला जात असून, लागवड केलेल्या प्रत्येक वृक्षाचे संगोपन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी कारागृह प्रशासनाने स्वीकारली आहे.
या प्रकल्पामुळे भविष्यात येरवडा कारागृह परिसर समृद्ध हरित पट्टा म्हणून विकसित होऊन पर्यावरण संवर्धनाचा आदर्श निर्माण करेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. 🌱🌳
– मानव मित्र न्यूज.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रधान यांच्या राजीनाम्याबद्दल पुण्यात तरुण मंडळांनी आनंदोत्सव साजरा केला पुणे बातम्या

0
पुणे : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर शनिवारी शहरात अनेक ठिकाणी जल्लोष करण्यात आला. SPPU टीचर्स असोसिएशनने शनिवारी देशभरातील आंदोलक विद्यार्थ्यांवर...

ग्राहक तक्रार पोर्टलवर गोपनीयतेची चिंता वाढवतात, FDA म्हणते डेटा सुरक्षित | पुणे बातम्या

0
तक्रार नोंदवण्यासाठी दिलेल्या त्यांच्या खाजगी तपशिलांचा गैरवापर होऊ शकतो, अशी भीती नागरिकांना वाटत आहे पुणे : अन्न आणि औषध प्रशासन (FDA) च्या ऑनलाइन...

विश्वचषक सुवर्णपदक विजेता लक्ष्य डोप चाचणीत नापास झाला

0
पुणे: भारतीय रोइंग आणि विशेषतः आर्मी रोइंग नोड (एआरएन) साठी मोठ्या पेचप्रसंगात, विश्वचषक सुवर्णपदक विजेता लक्ष्य याला स्पर्धेबाहेरील डोप चाचणीत सकारात्मक निकाल...

शिरूरमध्ये भितीच्या ढगाखाली बिबट्याने 2 वर्षात 5 व्या चिमुकल्याचा बळी घेतला पुणे बातम्या

0
वन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की पिंपळसुटी, मांडवगण फराटा आणि आजूबाजूची गावे मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड, विखुरलेली फार्महाऊस आणि बिबट्यांसाठी आदर्श आच्छादन आणि अधिवास...

गढूळ नळाच्या पाण्याच्या तक्रारींमध्ये रहिवासी पॅकेज्ड पाण्याकडे वळले | पुणे बातम्या

0
संपूर्ण शहरात 20-लिटर पॅकेज्ड पिण्याच्या पाण्याच्या कॅनची मागणी वाढली आहे पुणे: PMC कडून अनियमित पुरवठा आणि गढूळ, विरंगुळ्या पाण्याच्या अहवालांमुळे संपूर्ण शहरात 20-लिटर...

Translate »
error: Content is protected !!