Homeताज्या बातम्याजागतिक पर्यावरण दिन येरवडा कारागृहात ११ हजार वृक्षांची लागवड; घनदाट नागरी वन...

जागतिक पर्यावरण दिन येरवडा कारागृहात ११ हजार वृक्षांची लागवड; घनदाट नागरी वन उभारणीला सुरुवात

पुणे सासवड| प्रतिनिधी अशोक कुंभार
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कारागृह विभाग आणि रोटरी क्लब ऑफ पुणे टिळक रोड यांच्या संयुक्त विद्यमाने येरवडा कारागृह परिसरात ११ हजार वृक्षांची लागवड करून घनदाट नागरी वन (डेन्स अर्बन फॉरेस्ट) निर्माण करण्याच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला प्रारंभ करण्यात आला.
या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी कारागृह विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ. सुहास वारके (आयपीएस), म्युनिशन्स इंडिया लिमिटेडचे मानव संसाधन संचालक नंदकिशोर नाईक, रोटरी प्रांत ३१३१ चे प्रांतपाल संतोष मराठे, रोटरी क्लब ऑफ पुणे टिळक रोडचे अध्यक्ष देवदत्त हंबर्डीकर, कारागृह प्रशासनाचे अधिकारी शामकांत शेडगे, रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ चे पर्यावरण संचालक राजेंद्रकुमार सराफ तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.
वाढते शहरीकरण, प्रदूषण आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. येरवडा खुल्या कारागृहाच्या परिसरातील सुमारे एक एकर जागेवर घनदाट नागरी वन विकसित करण्यात येणार असून, यामुळे शहरातील हरित क्षेत्रात मोठी भर पडणार आहे.
घनदाट नागरी वनामुळे हवेची गुणवत्ता सुधारण्यास, कार्बन शोषण क्षमता वाढविण्यास, जैवविविधतेचे संवर्धन करण्यास आणि पर्यावरणीय संतुलन राखण्यास मदत होणार आहे. पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वपूर्ण पाऊल मानला जात असून, लागवड केलेल्या प्रत्येक वृक्षाचे संगोपन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी कारागृह प्रशासनाने स्वीकारली आहे.
या प्रकल्पामुळे भविष्यात येरवडा कारागृह परिसर समृद्ध हरित पट्टा म्हणून विकसित होऊन पर्यावरण संवर्धनाचा आदर्श निर्माण करेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. 🌱🌳
– मानव मित्र न्यूज.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

डिसेंबरपर्यंत ७०% फ्लीट टेक स्नॅग-मुक्त होईल: MSRTC

0
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर एमएसआरटीसीच्या बसेस पुणे : नवीन बसेसचा समावेश आणि जुनी वाहने स्क्रॅप केल्याने एमएसआरटीसीच्या कार्यक्षमतेत लक्षणीय सुधारणा होईल, असे राज्याचे...

जेजुरीतील भंडाऱ्याच्या शुद्धतेचा मुद्दा ऐरणीवर; ‘भंडारा म्हणजे शुद्ध हळद’ घोषित करण्याची मागणी

0
पुरंदर.जेजुरी (सासवड प्रतिनिधी – अशोक कुंभार) : जेजुरीसह राज्यातील विविध धार्मिक स्थळांवर विक्री होणाऱ्या भंडाऱ्यात भेसळ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर भंडाऱ्याच्या शुद्धतेचा प्रश्न पुन्हा एकदा...

PCMC ने फुगेवाडी येथील हुच दुर्घटनेतील आरोपींशी संबंधित बेकायदेशीर निवासी बांधकाम पाडले | पुणे...

0
फुगेवाडी येथील करनैल सिंग विरका यांचे घर नागरी अधिकाऱ्यांनी पाडले पुणे: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने (पीसीएमसी) गुरूवारी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये नुकत्याच झालेल्या बेकायदेशीर...

पुण्यातून राष्ट्रवादीचे काकडे यांची बिनविरोध निवड; जळगाव आणि नाशिकच्या लढतीत बंडखोर तापले; सोलापुरात भाजप...

0
राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काकडे यांनी सोमवारी पुणे विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला पुणे/नाशिक/कोल्हापूर: उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सर्व प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार...

प्रसाद नगरकर: फिटनेस हा ९० दिवसांचा प्रकल्प नाही. ती आयुष्यभराची बांधिलकी आहे : प्रसाद...

0
अशा युगात जेथे जलद निराकरणे फिटनेस संस्कृतीवर प्रभुत्व मिळवतात आणि नाट्यमय परिवर्तने सोशल मीडिया टाइमलाइन भरतात, संयम आणि दीर्घकालीन वचनबद्धतेमध्ये रुजलेल्या कथा...

Translate »
error: Content is protected !!