Homeताज्या बातम्याचाकणकरांना दिलासा! वर्षानुवर्षे प्रलंबित भाजी मंडई व हॉकर्स झोनचा प्रश्न मार्गी लागणार?

चाकणकरांना दिलासा! वर्षानुवर्षे प्रलंबित भाजी मंडई व हॉकर्स झोनचा प्रश्न मार्गी लागणार?

मानव मित्र न्यूज प्रतिनिधी माऊली घुंडरे
रस्त्यावरील अतिक्रमण, वाहतूक कोंडी आणि नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी नगरपरिषदेची मोठी हालचाल
चाकण शहरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला कायमस्वरूपी भाजी मंडई आणि हॉकर्स झोनचा प्रश्न अखेर मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शहरातील वाढती लोकसंख्या, औद्योगिक विस्तार आणि दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक लक्षात घेता चाकण नगरपरिषद प्रशासनाने या प्रश्नावर ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
सध्या शहरातील अनेक भाजी विक्रेते आणि फेरीवाले मुख्य रस्ते, चौक आणि पदपथांवर व्यवसाय करत असल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकांना दररोज वाहतूक कोंडी, पादचाऱ्यांची गैरसोय आणि अपघाताच्या धोक्याचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, विक्रेत्यांकडून शुल्क आकारले जात असले तरी त्यांना आणि नागरिकांना आवश्यक मूलभूत सुविधा मिळत नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. विशेषतः स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी आणि नियोजित जागांचा अभाव असल्याने अनेक सामाजिक संघटनांनी प्रशासनाकडे वारंवार मागणी केली आहे.
या पार्श्वभूमीवर चाकण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. अंकुश जाधव यांनी शहरासाठी नियोजनबद्ध हॉकर्स धोरण राबविण्याची माहिती दिली आहे. या योजनेअंतर्गत प्रमुख चौक, शाळा, बसस्थानके, धार्मिक स्थळे आणि गर्दीची ठिकाणे ‘नो-हॉकर झोन’ म्हणून निश्चित करण्यात येणार असून, इतर योग्य ठिकाणी अधिकृत हॉकर्स झोन विकसित करून भाजी विक्रेते व फेरीवाल्यांना व्यवसायासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, नागरिकांना मोकळे व सुरक्षित पदपथ उपलब्ध होतील आणि विक्रेत्यांनाही सन्मानाने व्यवसाय करण्यासाठी आवश्यक सुविधा मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
आता नगरपरिषदेच्या या घोषणेनंतर प्रत्यक्षात कामाला किती वेग मिळतो आणि चाकणकरांची अनेक वर्षांची प्रतीक्षा कधी संपते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गुरुपौर्णिमेनिमित्त मातोश्री चंद्रभागा आश्रमात भक्तिमय वातावरणात गुरुपूजन व कीर्तन सोहळा संपन्न

0
अंबाजोगाई, प्रतिनिधी (मेघा चाटे) : परळी वैजनाथ तालुक्यातील मातोश्री चंद्रभागा आश्रम, वैद्यनाथ मंदिराच्या पूर्वेस तुकाई रोड येथे परमपूज्य वै. ह. भ. प. गुरुवर्य मृदंड...

आंबेजोगाई येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन

0
आंबेजोगाई येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन केज (प्रतिनिधी – मेघा चाटे | मानव मित्र न्यूज): छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर...

‘हे आमचे मंदिर आहे’: दिल्लीतील पर्यटकांना महाराष्ट्राच्या लोहगड किल्ल्यावर धुम्रपान करण्यासाठी स्थानिकाने शिकविले

0
पुणे: महाराष्ट्राच्या ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावरील व्हायरल झालेल्या व्हिडिओने संरक्षित वारसा स्थळांवर पर्यटकांच्या वर्तनावर पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे.या क्लिपमध्ये किल्ल्याच्या तटबंदीवर...

मी पायउतार होण्यापूर्वी सर्व मुद्दे निकाली काढले होते: माजी डीएलटीए प्रमुख अनिल खन्ना

0
पुणे: ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (AITA) तसेच दिल्ली लॉन टेनिस असोसिएशन (DLTA) चे माजी अध्यक्ष अनिल खन्ना यांनी बुधवारी सांगितले की, DLTA...

कॅश फॉर डिग्री घोटाळ्याप्रकरणी एसपीपीयूने पोलिसात तक्रार दाखल केली, कर्मचाऱ्याला निलंबित केले | पुणे...

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी प्रमाणपत्राच्या कथित रोख रकमेप्रकरणी बुधवारी पोलिसात तक्रार दाखल केली, ज्यामध्ये विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यावर...

Translate »
error: Content is protected !!