Homeताज्या बातम्याकृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील करिअरसाठी एमआयटी-एडीटी विद्यापीठाचा नवा उपक्रम

कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील करिअरसाठी एमआयटी-एडीटी विद्यापीठाचा नवा उपक्रम

पुणे प्रतिनिधी रोहिदास कदम
पुणे: कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रातील वाढत्या संधी लक्षात घेऊन एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी (MIT-ADT) विद्यापीठाने ‘स्कूल ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ स्थापनेची घोषणा केली आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण देण्याचा विद्यापीठाचा मानस आहे.
या स्कूलअंतर्गत बी.टेक (आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग) आणि बी.टेक (आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स) हे चार वर्षांचे पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. डीप लर्निंग, कॉम्प्युटर व्हिजन, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, जनरेटिव्ह AI, डेटा अॅनालिटिक्स आणि इंटेलिजंट सिस्टिम्स यांसारख्या आधुनिक विषयांचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे.
पत्रकार परिषदेत कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., प्र-कुलगुरू डॉ. रामचंद्र पुजेरी आणि अधिष्ठाता डॉ. गणेश पाठक यांनी या उपक्रमाची माहिती दिली. विद्यार्थ्यांना पहिल्याच सत्रापासून उद्योगांशी संबंधित प्रकल्प, वास्तविक डेटासेट्स आणि आधुनिक AI साधनांवर काम करण्याची संधी दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० शी सुसंगत असलेल्या या अभ्यासक्रमात हेल्थकेअर, फिनटेक, अ‍ॅग्रीटेक, जनरेटिव्ह AI आणि एजेंटिक AI यांसारख्या क्षेत्रांमध्ये विशेष शिक्षण दिले जाणार आहे. तसेच AWS Academy, Coursera आणि edX सारख्या जागतिक प्लॅटफॉर्म्सच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना अतिरिक्त प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध होणार आहेत. ‌.
लोणी काळभोर येथील अत्याधुनिक कॅम्पसमध्ये AI प्रयोगशाळा, स्मार्ट क्लासरूम्स, GPU-TPU आधारित संगणकीय सुविधा आणि संशोधन केंद्रे उपलब्ध असतील. विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शकासोबत उद्योग मार्गदर्शकाचीही मदत मिळणार आहे.
प्र-कुलगुरू डॉ. रामचंद्र पुजेरी यांनी सांगितले की, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या नैतिक वापरावर विशेष भर देण्यात येणार असून डेटा गोपनीयता, AI गव्हर्नन्स आणि सामाजिक जबाबदारी यांसारखे विषय अभ्यासक्रमाचा महत्त्वाचा भाग असतील.
विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा प्र-कुलपती प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी सांगितले की, “तांत्रिक कौशल्यांसोबत नैतिक मूल्ये आणि मानवी संवेदनशीलता जपणारे AI नेतृत्व घडविणे हीच या स्कूलची प्रमुख उद्दिष्टे आहेत.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोडवर तरुणाची बेदम मारहाण करून हत्या; 15 जणांविरुद्ध गुन्हा, परिसरात खळबळ

0
पुणे |प्रतिनिधी अशोक कुंभार) पुण्यातील सिंहगड रोड परिसरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान झालेल्या वादाचे पर्यवसान एका २२ वर्षीय तरुणाच्या निर्घृण हत्येत झाले....

आळंदी पोस्ट ऑफिसचा हलगर्जी कारभार; नागरिकांची गैरसोय असह्य – सुविधा न दिल्यास शिवसेनेचा आंदोलनाचा...

0
आळंदी पोस्ट ऑफिसचा हलगर्जी कारभार; नागरिकांची गैरसोय असह्य – सुविधा न दिल्यास शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा आळंदी, दि. ३ (प्रतिनिधी : सचिन शिंदे) – लाखो वारकऱ्यांचे...

लोणीकंद पोलीस ठाण्यात वकिलाला मारहाणीचा आरोप; सीसीटीव्ही जप्त करून निष्पक्ष चौकशीची मागणी

0
पुणे |प संतोष कदम : पुण्यातील लोणीकंद पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस शिपायावर शिवाजीनगर न्यायालयातील वकील अॅड. साहिल शेख यांना बेदम मारहाण केल्याचा...

महाराष्ट्रात धर्मस्वातंत्र्य कायदा २०२६ लागू; जबरदस्ती, फसवणूक व आमिषाने धर्मांतराला आळा मुंबई

0
पुरंदर| (प्रतिनिधी अशोक कुंभार) महाराष्ट्रात 'महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा, २०२६' अधिकृत राजपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर राज्यभर लागू झाला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीनंतर ३० जुलैपासून...

कोल्हापुरात उभारले जाणार राज्यातील पहिले ‘अण्णाभाऊ साठे स्मृती व स्फूर्ती सदन’

0
पुरंदर सासवड| (प्रतिनिधी अशोक कुंभार): लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव आणि त्यांच्या विचारांचा वारसा जतन करण्यासाठी कोल्हापूर येथे राज्यातील पहिले ‘अण्णाभाऊ साठे स्मृती...

Translate »
error: Content is protected !!