Homeताज्या बातम्याउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पाळला; जेजुरी दुर्घटनेतील मृत वारकरी भगिनींच्या...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पाळला; जेजुरी दुर्घटनेतील मृत वारकरी भगिनींच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत सुपूर्द

पुणे आळंदी | प्रतिनिधी सचिन शिंदे
जेजुरी परिसरात झालेल्या दुर्दैवी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तीन वारकरी भगिनींच्या कुटुंबीयांना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी दिलेला मदतीचा शब्द अखेर पूर्ण केला. शिवसेना पक्ष आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून प्रत्येक मृत वारकरी भगिनीच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची आर्थिक मदत त्यांच्या मूळ गावी जाऊन सुपूर्द करण्यात आली.
या वेळी संबंधित कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे सांत्वन करण्यात आले. दुःखाच्या या प्रसंगी शिवसेना पक्ष व डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा विश्वासही देण्यात आला.
मदत मिळालेले कुटुंब
कै. राजश्री शंकर भोसले (करंडेवाडी, जि. सांगली)
कै. माधवी राजाराम भोसले (मालगाव, ता. मिरज)
कै. नंदा पवार (कवलापूर, जि. सांगली)
यावेळी शिवसेना प्रदेशाध्यक्ष ह.भ.प. अक्षयमहाराज भोसले आणि शिवसेना आमदार सुहासदादा बाबर यांनी संबंधित कुटुंबीयांशी संवाद साधत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने मदतीचे धनादेश सुपूर्द केले.
याशिवाय जेजुरी दुर्घटनेत जखमी झालेल्या वारकऱ्यांनाही तात्काळ आर्थिक मदत देण्यात आली. गंभीर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये, तर किरकोळ जखमींना प्रत्येकी २५ हजार रुपये मदत जाहीर करण्यात आली असून पुण्यात उपचार घेत असलेल्या जखमी वारकऱ्यांचीही भेट घेण्यात आली.
संकटाच्या काळात केवळ घोषणांवर न थांबता प्रत्यक्ष कृतीतून दिलेला शब्द पाळण्याची कार्यपद्धती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा दाखवून दिल्याची भावना यावेळी उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दोन वर्षानंतरही उरुळी-फुरसुंगी टीपी स्कीमला गती मिळाली नाही | पुणे बातम्या

0
पुणे : पीएमसी हद्दीतून उरुळी-फुरसुंगीचे विलगीकरण होऊन सुमारे दोन वर्षे उलटूनही या भागांची नगररचना (टीपी) योजना रखडली आहे. पीएमसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले TOI...

पुण्यातील मोशी एफडीएची लॅब घोषणेला एक वर्ष उलटूनही सुरूच नाही

0
सध्या अधिकाऱ्यांना मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील राज्य प्रयोगशाळांमध्ये नमुने पाठवणे भाग पडले आहे. पुणे: अन्न व औषध प्रशासन (FDA) ने पुणे...

लाडेवडगाव येथे आषाढी एकादशी उत्साहात साजरी;

0
आंबेजोगाई |मानव मित्र न्यूज प्रतिनिधी मेघा चाटे) केज तालुक्यातील लाडेगाव येथील वेदांत साधना गुरुकुल येथे परमपूज्य स्वामी भारतानंदजी महाराज यांच्या मठावर आषाढी (देवशयनी) एकादशी निमित्त...

क्युरेटेड लाइफस्टाइल प्रदर्शनांनी या पावसाळ्यात पुणे व्यापले आहे | पुणे बातम्या

0
सणासुदीच्या अगोदर घरातील क्युरेट केलेले पिसू आणि प्रदर्शने पुणे: पावसाळा जोरात सुरू असताना आणि क्षितिजावर सणासुदीचा हंगाम असल्याने, शहरात इनडोअर फ्ली मार्केट आणि...

पुणे पोलिसांनी बिश्नोई टोळीशी संबंधित एआय-संचालित खंडणी रॅकेटला तडाखा दिला पुणे बातम्या

0
पुणे : अत्याधुनिक सायबर पोलिस दलावर डिजिटल धार मिळवण्यासाठी गुन्हेगार शांतपणे त्यांच्या व्यापारात AI वापरण्याची कला पारंगत करत आहेत.डिजिटल पाऊलखुणा न सोडणाऱ्या...

Translate »
error: Content is protected !!