Homeताज्या बातम्याआळंदीत विकास लवांडे यांच्यावर शाईफेक; शहरात संताप, दोन्ही बाजूंनी निषेध आंदोलन

आळंदीत विकास लवांडे यांच्यावर शाईफेक; शहरात संताप, दोन्ही बाजूंनी निषेध आंदोलन

सासवड वार्ताहर
आळंदी म्हातोबा परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक झाल्याने आळंदी शहरातील वातावरण चांगलेच तापले आहे. संग्राम भंडारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा प्रकार केल्याचा आरोप करण्यात आला असून, या घटनेनंतर विविध स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट), काँग्रेस पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी आळंदी देवाची परिसरात एकत्र येत जाहीर निषेध आंदोलन केले. यावेळी “लोकशाहीत विरोध असू शकतो, मात्र शाईफेक आणि अपमानास्पद प्रकार योग्य नाहीत,” अशी भूमिका उपस्थितांनी मांडली.
या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष विलास कुऱ्हाडे, काँग्रेस शहराध्यक्ष संदीप नाईकरे, संजय वडगावकर, काळुराम येळवंडे, योगीराज सातपुते, विश्वंभर शिंदे, पितळी गणपती देवस्थानचे सुदीप गरुड यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
दुसरीकडे, संध्याकाळी महाद्वार चौकात वारकरी संप्रदायातील महाराज, ग्रामस्थ आणि भाविकांनी स्वतंत्र निषेध व्यक्त केला. विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदाय व गुरुवर्यांविषयी केलेल्या कथित वक्तव्यांमुळे भावना दुखावल्याचा आरोप करत, संग्राम भंडारे यांच्या भूमिकेला समर्थन देण्यात आले.
यावेळी उपसरपंच किरण मुंगसे, गणेश गरुड, संदीप महाराज लोहार, संतोषानंद महाराज शास्त्री आदी उपस्थित होते. “वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेचा आत्मा आहे. गुरुवर्यांचा अवमान सहन केला जाणार नाही,” असा इशारा उपस्थित महाराजांनी दिला.
आळंदी आणि केळगाव परिसरातील भाविक, महाराज आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या घटनेमुळे शहरात राजकीय आणि धार्मिक वातावरण अधिक तापण्याची चिन्हे दिसत असून, पुढील काळात आंदोलन तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दौंड येथील रेस्टोबारमध्ये वादातून तिघांनी एकाला बेदम मारहाण केली

0
पुणे : दौंड तालुक्यातील सहजपूर गावात आदल्या दिवशी एका व्यक्तीचा (३९) चाकूने भोसकून खून केल्याप्रकरणी यवत पोलिसांनी मंगळवारी तिघांना अटक केली.याप्रकरणी पिंपळे गुरव रहिवासी...

अजित पवार यांचे विमान बारामतीच्या हवाई पट्टीजवळ प्रशिक्षण विमान क्रॅश-लँड झाले

0
पुणे: रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीचे विमान बुधवारी सकाळी 8.50 च्या सुमारास पुणे जिल्ह्यातील बारामती हवाई पट्टीजवळ क्रॅश लँड झाले, यात प्रशिक्षणार्थी वैमानिक...

एसआयटीने ज्योतिषी अशोक खरात यांच्याविरुद्ध दोन लैंगिक गुन्ह्यांमध्ये आरोपपत्र दाखल केले

0
नाशिक : ज्योतिषी अशोक खरात यांच्याविरुद्ध लैंगिक छळ, फसवणूक आणि खंडणीच्या गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) बुधवारी नाशिक येथील न्यायालयात दोन प्रकरणांमध्ये...

दरवाढीच्या भीतीने पेट्रोल, डिझेलच्या विक्रीत २० टक्क्यांनी वाढ, पंतप्रधानांची घोषणा

0
पुणे: इंधनाच्या संभाव्य दरवाढीच्या अंदाजात पेट्रोल पंपांवर कोणतीही गर्दी दिसत नसली तरीही गेल्या दोन-तीन दिवसांत शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत सुमारे 20% वाढ झाल्याचे...

जनगणना कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांची ओळख सत्यापित करण्यासाठी QR कोड

0
पुणे: महाराष्ट्र 16 मे ते 14 जून या कालावधीत घरोघरी जाऊन गणनेचा सराव सुरू करणार असून, खऱ्या जनगणनेच्या अधिकाऱ्यांची ओळख पटविण्यासाठी नवीन...

Translate »
error: Content is protected !!