Homeताज्या बातम्याअंबोडी गावातील बाधित शेतकऱ्यांचे तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषण; १३ दिवस उलटूनही प्रशासनाची...

अंबोडी गावातील बाधित शेतकऱ्यांचे तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषण; १३ दिवस उलटूनही प्रशासनाची दखल नाही

सासवड (ता. पुरंदर, जि. पुणे अशोक कुंभार):
अंबोडी गावातील महारवतन धारक बाधित शेतकऱ्यांनी तहसीलदारांनी दिलेल्या अन्यायकारक आदेशाच्या निषेधार्थ तहसीलदार कार्यालयासमोर दिनांक १९ जानेवारी २०२६ पासून जाहीर बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले असून, आज या आंदोलनाला तेरा दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी यांनी अद्याप या आंदोलनाची कोणतीही दखल घेतलेली नाही.
तहसीलदारांनी दिलेला अन्यायकारक आदेश रद्द होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी घेतली आहे. प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्यामुळे शेतकरी अधिक संतप्त झाले असून, पुढील काळात उग्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. आंदोलन चिघळल्यास यास संपूर्ण प्रशासन जबाबदार राहील, असे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
हा निर्णय आर्थिक तडजोडीतून घेण्यात आल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला असून, सदर प्रकरणात फौजदारी गुन्हा दाखल होण्यास पात्र परिस्थिती आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे प्रांताधिकाऱ्यांनी सासवडचे मंडल अधिकारी सुहास कांबळे व माननीय तहसीलदार विक्रम राजपूत यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची परवानगी द्यावी, अशी ठाम मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
उपोषणात प्रकाश रामचंद्र रणपिसे, चंद्रकांत जनार्धन रणपिसे, अशोक डाकू रणपिसे यांच्यासह इतर बाधित शेतकरी सहभागी झाले आहेत. १३ दिवस उलटूनही प्रशासनाकडून कोणताही पर्याय किंवा तोडगा काढण्यात आलेला नाही, त्यामुळे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोणी काळभोरमध्ये संतापजनक घटना; गुंगीचे औषध देऊन महिलेसोबत अत्याचार

0
( सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार  ) पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. 33 वर्षीय महिलेला...

ILS विधी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या ध्वज शुल्काच्या समस्या आणि प्रशासनातील त्रुटी | पुणे बातम्या

0
संस्थेच्या कार्यपद्धतीत गट सुधारणा शोधतो पुणे: आयएलएस लॉ कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांनी संस्थेच्या अध्यक्षांना पत्र लिहून बेकायदेशीर शुल्क वसुली, विद्यार्थ्यांचे आंदोलन दडपून टाकणे, पारदर्शकतेचा...

कार्यरत नसलेल्या एसटीपी असलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांचा पाणीपुरवठा खंडित करण्यासाठी PCMC ने पथके तयार केली,...

0
पुणे : पिंपरी चिंचवड महापालिकेने (पीसीएमसी) वारंवार नोटिसा देऊनही सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) कार्यान्वित करण्यात अपयशी ठरलेल्या गृहनिर्माण संस्थांचा पाणीपुरवठा खंडित करण्यासाठी दोन विशेष...

पूर्वीचा तोटा भरून काढण्यासाठी माणूस दुसऱ्या ऑनलाइन शेअर-ट्रेडिंग घोटाळ्यात पडला, 66L रुपये गमावले

0
पुणे: शेअर-ट्रेडिंग घोटाळ्यातील नुकसान भरून काढण्यासाठी महागड्या बोलीमध्ये, एका खाजगी कंपनीच्या कर्मचाऱ्याने (57) पुन्हा दुसऱ्या कथित जागतिक गुंतवणूक व्यासपीठाचा बळी घेतला आणि गेल्या वर्षी...

एनआयबीएम-उंद्रीचे हिरवे ठिपके उष्णता, टंचाईमध्ये कोरडे पडले आहेत

0
पुणे: प्रदीर्घ पाणीटंचाईमुळे NIBM-उंड्री पट्ट्यातील टँकरवर अवलंबून असलेल्या शहरी जंगलांवर ताण पडत आहे, नियमित देखभाल विस्कळीत झाली आहे आणि उन्हाळ्याच्या वाढत्या तापमानामुळे अनेक हिरवे...

Translate »
error: Content is protected !!