मुंबई (प्रतिनिधी बबनराव मोहिते),शहरातील काही भागांमध्ये अतिक्रमणविरोधी कारवाईनंतर अनेक कुटुंबांना स्थलांतर करावे लागत असल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घर भाड्याने देताना संबंधित व्यक्तींची संपूर्ण ओळख पडताळणी, आवश्यक कागदपत्रांची तपासणी आणि पोलिस व्हेरिफिकेशन करूनच घर भाड्याने द्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
घरमालकांनी भाडेकरूंचे आधार कार्ड, पॅन कार्ड, कायमस्वरूपी पत्ता, रोजगाराची माहिती यांची खातरजमा करावी. तसेच स्थानिक पोलीस ठाण्यात भाडेकरूची नोंद करणे आणि पोलिस पडताळणी पूर्ण करणे हे कायदेशीरदृष्ट्या महत्त्वाचे मानले जाते.
तज्ज्ञांच्या मते, योग्य पडताळणी केल्यास भविष्यातील कायदेशीर व सुरक्षाविषयक अडचणी टाळता येऊ शकतात. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीस घर भाड्याने देताना सर्व आवश्यक नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























