Homeताज्या बातम्याN.A परवानगी इतिहासजमा; बांधकाम नकाशा मंजुरीच ठरणार अकृषक परवा

N.A परवानगी इतिहासजमा; बांधकाम नकाशा मंजुरीच ठरणार अकृषक परवा

मानव मित्र न्यूज प्रतिनिधी अशोक कुंभार
मुंबई, दि. ११ : राज्यातील नागरिकांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेत महाराष्ट्र सरकारने कृषी जमीन अकृषक (एन.ए.) करण्यासाठी लागणारी स्वतंत्र परवानगी प्रक्रिया रद्द केली आहे. आता नगर रचना विभाग किंवा स्थानिक नियोजन प्राधिकरणाने दिलेली बांधकाम नकाशा मंजुरी हीच अकृषक परवानगी म्हणून ग्राह्य धरली जाणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वतंत्र परवानगी घेण्याची आवश्यकता राहणार नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत महत्त्वपूर्ण सुधारणा केली असून त्यासंदर्भातील राजपत्रही जारी करण्यात आले आहे.
✅ जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वतंत्र परवानगीची गरज संपली
आतापर्यंत नागरिकांना बांधकाम नकाशा मंजुरीनंतर अकृषक परवानगीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात चकरा माराव्या लागत होत्या. नव्या नियमानुसार, विकास आराखड्यानुसार जमीन वापर अनुज्ञेय असल्यास नियोजन प्राधिकरणाची मंजुरीच अकृषक परवानगी मानली जाईल.
🏦 बँक कर्जासाठी सनदेची अट रद्द
बँकांकडून कर्ज देताना अकृषक सनदेची अट घातली जात होती. शासनाने स्पष्ट केले आहे की नियोजन प्राधिकरणाची मंजुरी मिळाल्यानंतर बँकांनी स्वतंत्र सनदेची मागणी करू नये. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सर्व बँकांना सूचना देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
💰 जुनी थकबाकी माफ
अकृषक कर थकीत असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा देत सुधारणा लागू होईपर्यंतची थकबाकी वसूल न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, २००१ पूर्वी किंवा नंतर बिनशेती झालेल्या जमिनींसाठी मालकांना एका वर्षाच्या आत विहित दराने एकरकमी अधिमूल्य भरावे लागेल.
📲 ऑनलाइन अर्ज सुविधा
बांधकाम परवानगीसाठी आता BPMS किंवा Auto DCR प्रणालीद्वारे ऑनलाइन अर्ज करता येईल. मंजुरी मिळाल्यानंतर ७/१२ उताऱ्यात फेरफार आपोआप नोंद होणार आहे.
📊 रुपांतरण अधिमूल्य दर
१००० चौ.मी. पर्यंत : बाजारमूल्याच्या ०.१०%
१००१ ते ४००० चौ.मी. : बाजारमूल्याच्या ०.२५%
४००० चौ.मी. पेक्षा जास्त : बाजारमूल्याच्या ०.५०%
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळणार असून वार्षिक अकृषक करही रद्द करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पीएमसीच्या १३ प्रभाग समित्यांचे अध्यक्षपद भाजपकडे; राष्ट्रवादी आणि काँग्रेसला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे

0
पुणे: जानेवारी महिन्यात झालेल्या पीएमसी निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवून भाजपने 15 पैकी 13 प्रभाग समित्यांचे अध्यक्षपद मिळवून नागरी प्रशासनावरील आपले नियंत्रण आणखी...

पीसीएमसी मेट्रो स्थानकात फीडर बस सेवा सुरू; प्रवाशांना कामकाजात सातत्य हवे

0
पुणे: महा मेट्रो आणि PMPML ने PCMC मेट्रो स्टेशनपासून अनेक मार्गांवर फीडर बस सेवा सुरू केली आहे, ज्यामुळे शेवटच्या मैलाची कनेक्टिव्हिटी सुधारली आहे, आतापर्यंत...

हैदराबाद मॉडेलवर अवलंबून राहण्यासाठी ओव्हरहेड केबल्सबाबत पीएमसीचे येऊ घातलेले धोरण

0
पुणे: शहरातील गोंधळलेल्या केबल नेटवर्कचे नियमन करण्यासाठी नागरी प्रशासनाने मंगळवारी मानक कार्यप्रणाली (SOP) तयार करण्यास सुरुवात केली. अधिकाऱ्यांनी सांगितले की नागरी संस्थेने हैदराबादचे मॉडेल...

नळांमधून गढूळ, दुर्गंधीयुक्त पाणी वाहत असल्याने जनवादी जनता वसाहत रहिवाशांचा निषेध, प्रदूषण दूर करण्यासाठी...

0
पुणे: जनवादी जनता वसाहत आणि परिसरात संताप आणि चिंतेचे वातावरण पसरले असून, गेल्या अनेक दिवसांपासून गढूळ, विरंगुळ्याचे पाणी येत असल्याची तक्रार रहिवाशांनी केली असून...

भाजी विक्रेता मॅच शोधण्यासाठी, आईला आनंद देण्यासाठी पोलिसांच्या नोकरीची कथा तयार करतो

0
पुणे: पोलिस हवालदाराची नोकरी, खाकीतील फोटो आणि सेलफोन मेसेजिंग ॲप्लिकेशनवर यापैकी एक चित्र प्रदर्शित करणारे चित्र असे पोस्टरमध्ये टोम-टोमिंग करण्यात आले आहे. नर्हे येथील...

Translate »
error: Content is protected !!