Homeताज्या बातम्याMIT ADT देशातील सर्वात मोठा आंतरमहाविद्यालयीन क्रीडा महोत्सव ‘विश्वनाथ स्पोर्ट्स मीट २०२६’...

MIT ADT देशातील सर्वात मोठा आंतरमहाविद्यालयीन क्रीडा महोत्सव ‘विश्वनाथ स्पोर्ट्स मीट २०२६’ पुण्यात

( प्रतिनिधी रवी कदम) पुणे, दि. ९ जानेवारी २०२६ :
एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी (एमआयटी एडीटी) विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणे येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही आठव्या ‘विश्वनाथ स्पोर्ट्स मीट २०२६’ या देशातील सर्वात मोठ्या राष्ट्रीय आंतरमहाविद्यालयीन क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा आठवा हंगाम दि. १३ ते १८ जानेवारी २०२६ दरम्यान विद्यापीठाच्या भव्य व अत्याधुनिक क्रीडा संकुलात पार पडणार आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवार, दि. १३ जानेवारी २०२६ रोजी पद्मश्री व अर्जुन पुरस्कार विजेते तसेच ऑलिम्पिक कास्यपदक विजेते मा. विजेंद्र सिंग यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाची अध्यक्षता एमआयटी शिक्षण समूहाचे संस्थापक विश्वधर्मी प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड करणार आहेत.
उद्घाटनप्रसंगी भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) नेताजी सुभाष राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार संस्थेच्या उपमहासंचालक व वरिष्ठ कार्यकारी संचालक विनित कुमार, मेजर ध्यानचंद पुरस्कारप्राप्त बॅडमिंटनपटू तृप्ती मुरगुंडे, विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. मंगेश कराड तसेच डॉ. सुनीता कराड यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
स्पर्धेचा समारोप व बक्षीस वितरण समारंभ दि. १८ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आला असून, यावेळी पद्मश्री व अर्जुन पुरस्कारप्राप्त तसेच आशियाई सुवर्णपदक विजेते कॅप्टन बजरंग लाल ताखर (व्हीएसएम) यांच्या हस्ते बक्षीस वितरण होणार आहे. याप्रसंगी ऑलिम्पियन व अर्जुन पुरस्कारप्राप्त जलतरणपटू वीरधवल खाडे तसेच मेजर ध्यानचंद पुरस्कारप्राप्त रोलर स्केटिंगपटू स्मिता शिरोळे यादव यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्या प्रेरणेतून व प्रा. डॉ. मंगेश कराड यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा संस्कृती रुजावी, विविध क्रीडा प्रकारांतून प्रतिभावान खेळाडू घडावेत, या उद्देशाने ‘विश्वनाथ स्पोर्ट्स मीट’ची सुरुवात करण्यात आली आहे. या स्पर्धेमुळे राज्य व देशाच्या क्रीडा संस्कृतीला मोलाचा हातभार लागणार आहे.
यंदाच्या स्पर्धेत देशातील १३५ हून अधिक शैक्षणिक संस्था व विद्यापीठांमधील ५,००० पेक्षा जास्त खेळाडू सहभागी होत असून, १५ विविध क्रीडा प्रकारांमध्ये आपली प्रतिभा सादर करणार आहेत. स्पर्धेच्या कालावधीत विद्यापीठ परिसरात दररोज १०,००० हून अधिक खेळाडू व प्रशिक्षकांचा वावर असणार आहे.
क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, कबड्डी, टेनिस, टेबल टेनिस, खो-खो, वॉटर पोलो, स्विमिंग (इनडोअर), बॉक्सिंग, आर्चरी (पुरुष/महिला) आदी क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. क्रिकेट स्पर्धेसाठी १२ विद्यापीठांचे संघ सहभागी होत असून, विजेत्या व उपविजेत्या संघांसाठी १० लाख रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. .
स्पर्धेसाठी राज्य व देशातून येणाऱ्या खेळाडूंसाठी निवास, भोजन व वैद्यकीय सुविधांची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या नावनोंदणी सुरू असून, अधिकाधिक खेळाडूंनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस.कुलसचिव डॉ.महेश चोपडे क्रीडा संचालक व शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रा.राजेश पद्माकर फड तसेच डॉप्रतिभा जगताप यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

डेडलाइन पाच दिवसांत संपते, पण खड्डे पडलेले रस्ते दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत

0
पावसाळ्यात रस्त्यांची दुरुस्ती लवकर न झाल्यास धोकादायक होणार आहेपीएमसीने अंतिम मुदतीपूर्वी रस्त्यांचे रिसरफेसिंग पूर्ण केलेले नाहीपावसाळ्यात रस्त्यांची दुरुस्ती लवकर न झाल्यास धोकादायक होणार...

बीड जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मरचे अवैध शिफ्टिंग करताना वीज पडून कामगाराचा मृत्यू झाला

0
AI वापरून प्रातिनिधिक प्रतिमा तयार केली बीड: महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात कथितरित्या ट्रान्सफॉर्मर हलवताना एका ३५ वर्षीय मजुराचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची माहिती...

कुंभार समाजजोती मंडळ, पुणे जिल्हा आयोजित राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा संपन्न होणार

0
पुणे सासवड (प्रतिनिधी अशोक कुंभार) कुंभार समाजजोती मंडळ, पुणे जिल्हा यांच्या वतीने राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा रविवार दि....

संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यावर RRC कारवाईचे आदेश; शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मोठे यश

0
घनसावंगी | प्रतिनिधी राहुल बोबडे पैठण तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत एफआरपी (FRP) रकमेप्रकरणी प्रशासनाने संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यावर कठोर कारवाईचे आदेश जारी...

यंदाच्या जानेवारी-मार्चमध्ये पुणे कार्यालय भाडेतत्त्वावर मंदावले; पुरवठा खंडित असताना भाडे वाढले

0
पुणे: 2026 च्या पहिल्या तिमाहीत (जानेवारी-मार्च) पुण्यातील कार्यालयीन जागेची मागणी कमी झाली असून, गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील 20 लाख चौरस फूट वरून...

Translate »
error: Content is protected !!