घोअलोट गर्दी — जय जय स्वामी समर्थ घोषात भाविकांचा उत्साह
अक्कलकोट (जि. सोलापूर) निर्मला पवार
श्री स्वामी समर्थांच्या पवित्र भूमीत गुरुवार, दिनांक 30 ऑक्टोबर 2025 रोजी भाविकांची अलोट गर्दी झाली. श्री स्वामी समर्थांच्या स्वयंभू मंदिरात दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांचा ओघ सुरू होता. “श्री स्वामी समर्थ… जय जय स्वामी समर्थ…” या जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
भक्तांच्या ओठांवर स्वामींचे नामस्मरण, चेहऱ्यावर भक्तिभाव आणि वातावरणात दैवी ऊर्जा अनुभवायला मिळाली. दूरदूरहून भाविक दर्शनासाठी आले होते. स्वामींचे दर्शन घेतल्यानंतर प्रत्येक भक्ताच्या चेहऱ्यावर समाधानाचे, शांतीचे भाव उमटले.
अक्कलकोट हे श्री स्वामी समर्थांचे स्वयंभू स्थळ असून, येथे येणाऱ्यांना आत्मिक शांतता आणि समाधानाचा अनुभव मिळतो. भाविकांनी नम्र विनंती केली आहे की, प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी अक्कलकोटला भेट द्यावी आणि या दैवी स्थळाचा आनंद घ्यावा.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























