Homeताज्या बातम्याआळंदी पोस्ट ऑफिसचा हलगर्जी कारभार; नागरिकांची गैरसोय असह्य – सुविधा न दिल्यास...

आळंदी पोस्ट ऑफिसचा हलगर्जी कारभार; नागरिकांची गैरसोय असह्य – सुविधा न दिल्यास शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

आळंदी पोस्ट ऑफिसचा हलगर्जी कारभार; नागरिकांची गैरसोय असह्य – सुविधा न दिल्यास शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा
आळंदी, दि. ३ (प्रतिनिधी : सचिन शिंदे) – लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या आळंदी शहरातील पोस्ट कार्यालयाचा कारभार नागरिकांच्या संतापाचा विषय ठरत असून, गेल्या तब्बल ५० वर्षांपासून धर्मशाळेच्या जागेत अत्यंत अपुऱ्या आणि गैरसोयीच्या जागेत पोस्ट कार्यालय सुरू आहे. नागरिकांना साधे प्रतीक्षालय, बसण्याची व्यवस्था किंवा ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षणाची सुविधा नसल्याने ग्राहकांना रस्त्यावर उभे राहून सेवा घ्यावी लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे.
विशेष म्हणजे, पोस्ट कार्यालयासाठी आरक्षित जागा उपलब्ध असतानाही भारतीय टपाल विभागाकडून स्वतःच्या जागेवर आधुनिक इमारत उभारण्याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचा आरोप आळंदी शहर शिवसेना प्रमुख राहुल ज्ञानेश्वर चव्हाण यांनी केला आहे. आळंदीसारख्या धार्मिक आणि ऐतिहासिक शहरात अत्याधुनिक पोस्ट कार्यालय उभारून नागरिकांना दर्जेदार सुविधा देण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी संबंधित विभागाकडे केली आहे. तसेच येत्या काही महिन्यांत परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
आळंदीमध्ये वर्षभर भाविकांची मोठी वर्दळ असते. विशेषतः आषाढी आणि कार्तिकी वारीच्या काळात लाखो वारकरी येथे दाखल होत असतात. मात्र अशा महत्त्वाच्या शहरातील पोस्ट कार्यालय आजही अत्यंत अपुऱ्या जागेत कार्यरत आहे. पावसाळ्यात कार्यालय परिसरात पाणी साचणे, छताला गळती लागणे, ग्राहकांना उभे राहण्यासाठी जागा नसणे, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांगांना होणारा त्रास, तसेच बँकिंग व टपाल सेवा घेण्यासाठी होणारी प्रचंड गैरसोय यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
नवीन पोस्ट कार्यालयात प्रशस्त प्रतीक्षालय, पावसापासून संरक्षणाची व्यवस्था, वाहनतळ, दिव्यांगांसाठी रॅम्प, स्वच्छतागृह, डिजिटल सेवा केंद्र, पुरेशी कर्मचारी संख्या आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
भारतीय टपाल विभाग आणि संबंधित प्रशासनाने तातडीने पाहणी करून नागरिकांच्या अडचणींची दखल घ्यावी व पोस्ट कार्यालयाचे सुरक्षित आणि प्रशस्त ठिकाणी स्थलांतर करावे किंवा नवीन अत्याधुनिक इमारत उभारण्याचा निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी नागरिकांमधून होत आहे. आळंदीसारख्या जागतिक कीर्तीच्या तीर्थक्षेत्रात आधुनिक आणि सुसज्ज पोस्ट कार्यालय उभारणे ही आता केवळ मागणी नसून काळाची गरज बनली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोडवर तरुणाची बेदम मारहाण करून हत्या; 15 जणांविरुद्ध गुन्हा, परिसरात खळबळ

0
पुणे |प्रतिनिधी अशोक कुंभार) पुण्यातील सिंहगड रोड परिसरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान झालेल्या वादाचे पर्यवसान एका २२ वर्षीय तरुणाच्या निर्घृण हत्येत झाले....

लोणीकंद पोलीस ठाण्यात वकिलाला मारहाणीचा आरोप; सीसीटीव्ही जप्त करून निष्पक्ष चौकशीची मागणी

0
पुणे |प संतोष कदम : पुण्यातील लोणीकंद पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस शिपायावर शिवाजीनगर न्यायालयातील वकील अॅड. साहिल शेख यांना बेदम मारहाण केल्याचा...

महाराष्ट्रात धर्मस्वातंत्र्य कायदा २०२६ लागू; जबरदस्ती, फसवणूक व आमिषाने धर्मांतराला आळा मुंबई

0
पुरंदर| (प्रतिनिधी अशोक कुंभार) महाराष्ट्रात 'महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा, २०२६' अधिकृत राजपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर राज्यभर लागू झाला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीनंतर ३० जुलैपासून...

कोल्हापुरात उभारले जाणार राज्यातील पहिले ‘अण्णाभाऊ साठे स्मृती व स्फूर्ती सदन’

0
पुरंदर सासवड| (प्रतिनिधी अशोक कुंभार): लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव आणि त्यांच्या विचारांचा वारसा जतन करण्यासाठी कोल्हापूर येथे राज्यातील पहिले ‘अण्णाभाऊ साठे स्मृती...

आळंदीत जाणीव संघटने तर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

0
आळंदी / वार्ताहर माऊली घुंडरे:)येथील जाणीव संघटना प्रणित महिला मंडळ, पथारी व्यवसायिक यांचे वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन...

Translate »
error: Content is protected !!