पुणे मानवमित्र न्यूज:(संपादक रविदास कदम)
देहू फाटा वाई-जंक्शन येथील नवीन एसटी स्टँड परिसरात गेल्या तीन वर्षांपासून एक लाल रंगाची मारुती सुझुकी डिजायर कार न ,(MH14AM 8798)बेवारस अवस्थेत उभी होती. स्थानिक नागरिकांनी वारंवार पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधूनही संबंधित यंत्रणांनी या वाहनाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.
तीन वर्षांच्या कालावधीत अज्ञात व्यक्तींनी या वाहनाचे टायर, काचा तसेच इतर LD screen सुटे भाग काढून नेले. वाहनाची पूर्णपणे तोडफोड झाल्यानंतर अखेर आज अज्ञातांनी कारला आग लावल्याची घटना घडली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
स्थानिक नागरिकांचा प्रश्न आहे की, एवढ्या काळापासून एकाच ठिकाणी बेवारस वाहन उभे असताना पोलीस, नगरपालिका व संबंधित प्रशासनाने त्याची दखल का घेतली नाही? हे वाहन नेमके कोणाचे होते, ते येथे कसे आले आणि त्याची नोंद कोणत्या पोलीस ठाण्यात होती, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती उपलब्ध झालेली नाही.
या घटनेमुळे बेवारस वाहनांबाबत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधित घटनेची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. .

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























