Homeताज्या बातम्याहॉटेलच्या किचनमध्ये झुरळ, पाल दिसल्यास कठोर कारवाई; व्हेज-नॉनव्हेज वेगळे ठेवणे बंधनकारक

हॉटेलच्या किचनमध्ये झुरळ, पाल दिसल्यास कठोर कारवाई; व्हेज-नॉनव्हेज वेगळे ठेवणे बंधनकारक

मु|(प्रतिनिधी अशोक कुंभार)
हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे, मिठाई दुकाने, बेकरी तसेच अन्नपदार्थांवर प्रक्रिया करणाऱ्या सर्व आस्थापनांनी स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.
किचनमध्ये झुरळ, पाल किंवा इतर अस्वच्छता आढळल्यास संबंधित आस्थापनांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. एफडीएच्या नियमांनुसार किचनमध्ये स्वच्छता राखणे, अन्नपदार्थांची योग्य साठवणूक करणे आणि अन्न सुरक्षेच्या सर्व निकषांचे पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच, व्हेज आणि नॉनव्हेज अन्नपदार्थ स्वतंत्रपणे ठेवणे बंधनकारक असून, अन्न तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या भांडी व साहित्याचीही योग्य स्वच्छता राखावी लागणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणालाही सोडले जाणार नाही, असे मुंढे यांनी स्पष्ट केले.
अन्न सुरक्षा आणि ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही मोहीम अधिक कठोर करण्यात येणार असून, राज्यभरातील हॉटेल्स व खाद्य व्यावसायिकांवर विशेष तपासण्या सुरू राहणार आहेत.
शॉ👉 हॉटेल किचनमध्ये अस्वच्छता आढळल्यास थेट कारवाई! 👉 झुरळ-पाल दिसली तर हॉटेल मालकांवर कारवाईचा बडगा 👉 व्हेज-नॉनव्हेज वेगळे ठेवा, FDAचा इशाराFDA ने किचनसाठीही काही महत्त्वाचे निकष जाहीर केले आहेत:
किचन स्वच्छ व टाइल्सयुक्त असावे.
पेस्ट कंट्रोलचे प्रमाणपत्र दर्शनी भागात लावणे आवश्यक.
एक्झॉस्ट फॅन आणि चिमणी असणे बंधनकारक.
किचनमध्ये हवा खेळती राहील याची व्यवस्था असावी.
एकदा वापरलेले खाद्यतेल पुन्हा वापरू नये.
गरम व थंड खाद्यपदार्थ योग्य तापमानात ठेवावेत.
किचनमध्ये झुरळ, पाल किंवा इतर कीटक आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल.
व्हेज आणि नॉनव्हेज खाद्यपदार्थ स्वतंत्र ठेवणे आवश्यक आहे.
अन्नसुरक्षेबाबत कोणतीही तक्रार असल्यास नागरिकांनी FDA च्या टोल-फ्री हेल्पलाइन क्रमांक 1800-222-365 वर संपर्क साधून तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अण्णा हजारे 5 जुलैच्या उपोषणावर ठाम; सीआयसीने म्हटले आहे की चर्चेची आणखी एक फेरी...

0
महाराष्ट्र सरकारने आरटीआयचे नवीन नियम मागे न घेतल्यास 5 जुलैपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा ज्येष्ठ कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दिला आहे. पुणे :...

आषाढी वारीत भाविकांची गैरसोय होणार नाही; शासन सज्ज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
📰 बातमी (प्रतिनिधी अशोक कुंभार) मुंबई, दि. २४ : आषाढी वारी हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा महत्त्वपूर्ण सोहळा असून यंदाच्या वारीत लाखो वारकरी आणि...

2,004 कॉल, 238 तास आणि 1 अंतिम ‘सिग्नल’: युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळावर केतन अग्रवालच्या...

0
पुणे ग्रामीण पोलिसांचे म्हणणे आहे की रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या मृत्यूमागील कथित षडयंत्र अनेक महिन्यांच्या गुप्त संवाद, अनेक बैठका आणि त्यांना...

‘बळीचा बकरा बनवला जात आहे’: आरोपी चेतन चौधरीच्या वडिलांनी केतन अग्रवाल खून प्रकरणात मुलाची...

0
केतन विशाल अग्रवाल मंगेतर सिया गोयल, प्रियकर चेतन चौधरी, चेतनचे वडील बाबूलाल चौधरी (एलआर) सोबत पुणे : पुण्यातील रिअल इस्टेट व्यावसायिक केतन विशाल...

आंबेनळी घाटाचे रुंदीकरण करणार : सार्वजनिक बांधकाम मंत्री

0
आंबेनळी घाटावरील घटनास्थळ जिथे 24 मे रोजी 8 जणांना घेऊन जाणारी SUV दरीत कोसळली होती. पुणे : कोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणाऱ्या आंबेनळी घाटाच्या...

Translate »
error: Content is protected !!