Homeताज्या बातम्या"रस्ता आणि ट्रॅफिकचा तिढा कधी सुटणार? आळंदी-देहूफाटा परिसरातील नागरिकांचा संतप्त सवाल"

“रस्ता आणि ट्रॅफिकचा तिढा कधी सुटणार? आळंदी-देहूफाटा परिसरातील नागरिकांचा संतप्त सवाल”

आळंदी( प्रतिनिधी सचिन शिंदे) पुणे-आळंदी मार्गावरील काळेवाडी, देहूफाटा व वाय जंक्शन परिसरात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्ता काही ठिकाणी रुंद तर काही ठिकाणी अतिशय अरुंद असल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण होत आहेत. त्यातच रस्त्यालगत उभे असलेले इलेक्ट्रिक पोल, वीज वितरणाचे डीपी आणि विविध बॅनर्स यामुळे उपलब्ध जागा आणखी कमी होत आहे.
परिसरात एका बाजूनेच काम सुरू असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून वाहतूक कोंडी नित्याची बाब झाली आहे. पर्यायी रस्ता नसल्याने नागरिक, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, रस्ता समतोल आणि सुरक्षित करण्याऐवजी काही ठिकाणी रुंदी कमी झाल्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. विशेषतः वाय जंक्शन ते धाकट्या पादुका परिसरात पादचाऱ्यांना चालण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही. इलेक्ट्रिक पोल, डीपी आणि अनधिकृत बॅनर्स यामुळे रस्त्यावरील मोकळी जागा अडवली जात आहे.
नागरिकांच्या मते, संबंधित विभागाने रस्त्याच्या कडेला असलेले अडथळे हटवून रस्ता दोन्ही बाजूंनी समतल व एकसमान रुंदीचा करावा. तसेच फुटपाथची व्यवस्था करून पादचाऱ्यांसाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून द्यावा.
याबाबत प्रशासनाने तातडीने दखल घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अन्यथा भविष्यात मोठ्या दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
— मानव मित्र न्यूज
प्रतिनिधी सचिन शिंदे आळंदी

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आंबेजोगाई येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन

0
केज (प्रतिनिधी – मेघा चाटे | मानव मित्र न्यूज): छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर अभियानांतर्गत आंबेजोगाई येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे....

PMC 75 नागरी शाळांचे आदर्श शाळांमध्ये रूपांतर करण्यासाठी पायाभूत कामे सुरू करणार आहे

0
नागरी संस्थेच्या कार्यक्षेत्रात सुमारे 180 महापालिका शाळा इमारती आहेत, ज्यात विलीन झालेल्या भागांचा समावेश आहे. पुणे : मॉडेल स्कूल्स (आदर्श शाला) प्रकल्पांतर्गत ओळखल्या...

स्टेकहोल्डर्सची दिल्लीत बैठक झाली, पण राष्ट्रवादीचे विलीनीकरण नाही असे पवार म्हणतात

0
शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) एनडीएशी हातमिळवणी करू शकते, अशीही अटकळ सुरू आहे. पुणे : ज्येष्ठ राजकारणी शरद पवार यांनी मंगळवारी नवी...

कायदेशीर नोटीस AITA आणि DLTA च्या निष्कासनासाठी कॉल करते

0
पुणे: अडचणीत सापडलेल्या ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (एआयटीए) आणि दिल्ली लॉन टेनिस असोसिएशनला मंगळवारी दिल्लीच्या भूमी आणि विकास अधिकारी (एल अँड डीओ)...

चाकणकरांना दिलासा! वर्षानुवर्षे प्रलंबित भाजी मंडई व हॉकर्स झोनचा प्रश्न मार्गी लागणार?

0
मानव मित्र न्यूज प्रतिनिधी माऊली घुंडरे रस्त्यावरील अतिक्रमण, वाहतूक कोंडी आणि नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी नगरपरिषदेची मोठी हालचाल चाकण शहरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला कायमस्वरूपी...

Translate »
error: Content is protected !!