Homeताज्या बातम्या"रस्ता आणि ट्रॅफिकचा तिढा कधी सुटणार? आळंदी-देहूफाटा परिसरातील नागरिकांचा संतप्त सवाल"

“रस्ता आणि ट्रॅफिकचा तिढा कधी सुटणार? आळंदी-देहूफाटा परिसरातील नागरिकांचा संतप्त सवाल”

आळंदी( प्रतिनिधी सचिन शिंदे) पुणे-आळंदी मार्गावरील काळेवाडी, देहूफाटा व वाय जंक्शन परिसरात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्ता काही ठिकाणी रुंद तर काही ठिकाणी अतिशय अरुंद असल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण होत आहेत. त्यातच रस्त्यालगत उभे असलेले इलेक्ट्रिक पोल, वीज वितरणाचे डीपी आणि विविध बॅनर्स यामुळे उपलब्ध जागा आणखी कमी होत आहे.
परिसरात एका बाजूनेच काम सुरू असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून वाहतूक कोंडी नित्याची बाब झाली आहे. पर्यायी रस्ता नसल्याने नागरिक, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, रस्ता समतोल आणि सुरक्षित करण्याऐवजी काही ठिकाणी रुंदी कमी झाल्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. विशेषतः वाय जंक्शन ते धाकट्या पादुका परिसरात पादचाऱ्यांना चालण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही. इलेक्ट्रिक पोल, डीपी आणि अनधिकृत बॅनर्स यामुळे रस्त्यावरील मोकळी जागा अडवली जात आहे.
नागरिकांच्या मते, संबंधित विभागाने रस्त्याच्या कडेला असलेले अडथळे हटवून रस्ता दोन्ही बाजूंनी समतल व एकसमान रुंदीचा करावा. तसेच फुटपाथची व्यवस्था करून पादचाऱ्यांसाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून द्यावा.
याबाबत प्रशासनाने तातडीने दखल घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अन्यथा भविष्यात मोठ्या दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
— मानव मित्र न्यूज
प्रतिनिधी सचिन शिंदे आळंदी

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

एनसीसी महाने रोजगारक्षमता मोहीम सुरू केली

0
पुणे : NCC महाराष्ट्राने पंतप्रधान इंटर्नशिप स्कीम (PMIS) अंतर्गत एकात्मिक रोजगारक्षमता उपक्रम सुरू केला आहे, ज्याचा उद्देश एनसीसी कॅडेट्स आणि माजी कॅडेट्सना...

पुण्यातील तळेगाव एमआयडीसी युनिटमध्ये देखभालीदरम्यान CO₂ लीक झाल्याने 2 ठार, 3 जखमी

0
AI-व्युत्पन्न केलेली प्रतिमा प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली जाते. पुणे: तळेगाव महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) परिसरातील बहुराष्ट्रीय कॉर्पोरेशन (एमएनसी) प्लांटमध्ये मंगळवारी दुपारी देखभालीच्या कामात...

लावणी, ड्रॅग आणि ड्रामा: पुणे सतरंग फेस्ट विलक्षण कथा साजरा करतो

0
अहोन गुप्तूच्या ड्रॅग ड्रामा 'आयटम' मधील दृश्ये (फोटो क्रेडिट: नयनतारा मुझुमदार) पुणे: या जून महिन्यात सहा दिवसांसाठी, श्रीराम लागू रंग-आकाश विलक्षण कथाकथन, कार्यप्रदर्शन...

महत्त्वाच्या येरवडा जंक्शनवर उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटरच्या प्रस्तावात प्रथम झाडे

0
पुणे : अलिकडच्या वर्षांत पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसाठी झाडांचा बळी देण्यावरून शहरातील रहिवासी आणि नागरी प्रशासन यांच्यात अनेक संघर्ष झाले आहेत. पुणे महानगरपालिकेची कृती योजना...

भाजप भटके विमुक्त मोर्चाच्या स्नेह संमेलनात सीए अविनाश मोहिते यांचा सत्कार; बलराज वारकर यांची...

0
प्रतिनिधी (अशोक कुंभार)भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त मोर्चा, मुंबई यांच्या वतीने आयोजित स्नेह संमेलन उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाला भाजपा मुंबईचे अध्यक्ष आमदार...

Translate »
error: Content is protected !!