Homeताज्या बातम्याआळंदी मंदिरात अक्षय तृतीया दिनी श्रींचे विठ्ठल रूप चंदनउटी — भाविकांची मोठी...

आळंदी मंदिरात अक्षय तृतीया दिनी श्रींचे विठ्ठल रूप चंदनउटी — भाविकांची मोठी गर्दी

आळंदी (अशोक कुंभार प्रतिनिधी ) : अक्षय तृतीया निमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर येथे श्रींचे वैभवी विठ्ठल रूप चंदनउटीद्वारे साकारण्यात आले. आकर्षक चंदन उटीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

पुण्यातील मूर्तिकार अभिजित धोंडफळे व सहकाऱ्यांनी परिश्रमपूर्वक ही लक्षवेधी चंदन उटी साकारली. श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आणि स्वकाम सेवा मंडळ आळंदी यांच्या वतीने ही सेवा उत्साहात पार पडली. अशी माहिती व्यवस्थापक माऊली वीर यांनी दिली.

चैत्र महिन्यातील परंपरेनुसार संजीवन समाधीवर चंदन उटी लावून श्रींचे विठ्ठल रूप साकारण्यात आले. मोगऱ्याच्या फुलांनी सजलेला गाभारा, आकर्षक सजावट आणि श्री ज्ञानेश्वरीची चंदनातील प्रतिकृती हे भाविकांचे विशेष आकर्षण ठरले. महिलांनी चैत्र गौरी पूजनासह श्रींचे दर्शन घेतले.

अक्षय तृतीया निमित्त मंदिरात घंटानाद, काकडा, पवमान अभिषेक, दुधारती, पूजा तसेच हळदी-कुंकू कार्यक्रम उत्साहात पार पडले. कारंजा मंडपात चैत्र गौरी पूजनासाठी आकर्षक सजावट करण्यात आली होती.

देवस्थान आणि स्वकाम सेवा मंडळाच्या वतीने अध्यक्ष सुनील तापकीर, महिला अध्यक्षा आशा तापकीर यांच्यासह सेवकांनी चंदन उटीचे नियोजन केले.

या प्रसंगी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त भावार्थ देखणे, योगी निरंजन नाथसाहेब, चैतन्य महाराज कबीरबुवा लोंढे, पुरुषोत्तम महाराज पाटील, राजेंद्र उमाप, रोहिणी पवार आदींच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडले.                                                                                                     

दरम्यान, तक्षशिला बुद्ध विहार येथे आळंदी संविधान जागर अभियान अंतर्गत संविधान जनजागृती साहित्याचे वाटप अभियान प्रमुख अर्जुन मेदनकर यांच्या हस्ते करण्यात आले.

अक्षय तृतीया निमित्त श्रींचे विठ्ठल रूप दर्शन घेत भाविकांनी माऊलींचे वैभवी दर्शन डोळ्यांत साठविले.

🙏✨

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कोल्हापुरात उभारले जाणार राज्यातील पहिले ‘अण्णाभाऊ साठे स्मृती व स्फूर्ती सदन’

0
पुरंदर सासवड| (प्रतिनिधी अशोक कुंभार): लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव आणि त्यांच्या विचारांचा वारसा जतन करण्यासाठी कोल्हापूर येथे राज्यातील पहिले ‘अण्णाभाऊ साठे स्मृती...

आळंदीत जाणीव संघटने तर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

0
आळंदी / वार्ताहर माऊली घुंडरे:)येथील जाणीव संघटना प्रणित महिला मंडळ, पथारी व्यवसायिक यांचे वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन...

साईबाबांच्या चरणी विक्रमी दान; अवघ्या तीन दिवसांत ७७ कोटी ८१ लाखांची देणगी

0
बीड | प्रतिनिधी मेघा चाटे शिर्डी येथील श्री साईबाबा समाधी मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त देश-विदेशातून लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. २८ ते ३० जुलै २०२६...

आमदार विजय शिवतारे यांच्या पाठपुराव्याला यश; ग्रामीण भागासाठी नवीन PMPML बससेवा सुरू

0
पुरंदर सासवड| (प्रतिनिधी अशोक कुंभार,( पुरंदर तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांसाठी दिलासादायक निर्णय घेत हडपसर–सासवड–कुंभारवळण–बेलसर–जेजुरी–नाझरे–मोरगाव या मार्गावर आजपासून नवीन PMPML बससेवा सुरू करण्यात आली आहे. या...

श्री क्षेत्र मरकळ येथे गुरुपौर्णिमा महोत्सव भक्तिभावात संपन्न; धार्मिक विधी, पालखी सोहळा आणि महाप्रसादासाठी...

0
मरकळ,( प्रतिनिधी रोहिदास कदम)गुरुतत्त्वाविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा आणि अध्यात्माची अनुभूती देणारा गुरुपौर्णिमा महोत्सव यंदा श्री क्षेत्र मरकळ येथील पंचलिंग देवस्थान दत्तभक्त ताई माऊली मठात...

Translate »
error: Content is protected !!