Homeताज्या बातम्याहडपसरमधील भीषण आग : २५ झोपड्या जळून खाक, अनेक कुटुंबे बेघर 🔥

हडपसरमधील भीषण आग : २५ झोपड्या जळून खाक, अनेक कुटुंबे बेघर 🔥

(मानव मित्र न्यूज प्रतिनिधी बबनराव मोहिते पाटील)

📍 पुणे, हडपसर | दिनांक : २२ मार्च २०२६

पुण्यातील हडपसर परिसरातील शंकरमठा येथील मिरेकर वस्तीमध्ये पहाटे लागलेल्या भीषण आगीत तब्बल २५ झोपड्या जळून खाक झाल्या. या दुर्घटनेमुळे अनेक कुटुंबे बेघर झाली असून गेल्या तीन दिवसांपासून ते अन्न, पाणी आणि निवाऱ्याविना उघड्यावर जीवन जगत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, वैदूवाडी वाहतूक शाखेजवळील कालव्यालगत असलेल्या मिरेकर वस्तीमध्ये शनिवारी (दि. ७) अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने भीषण रूप धारण करत झोपड्यांना वेढा घातला. झोपेत असलेल्या नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी घराबाहेर धाव घेतल्याने मोठी जीवितहानी टळली, मात्र सर्वांचे संसार उघड्यावर आले.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असली तरी आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

या आगीत घरातील टीव्ही, पंखे, गॅस सिलिंडर, मिक्सर, भांडीकुंडी, कपडे, सायकली तसेच काहींच्या दुचाकी आणि रिक्षा पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत.

दरम्यान, वडार समाजाचे समाजसेवक सागर अशोक चौगुले यांनी घटनास्थळी तातडीने भेट देत पीडित कुटुंबांची विचारपूस केली. तसेच भरत विठकर यांची भेट घेऊन त्यांनी पीडितांना तत्काळ आर्थिक मदतही केली.

सध्या या कुटुंबांना तातडीने अन्न, पाणी आणि निवाऱ्याची गरज असून प्रशासनाने त्वरित मदत करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.                       

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आवेगपूर्ण नोकरी करू नका, org मध्ये भूमिका बदलण्याचा प्रयत्न करा: अदानी GCC सीईओ विद्यार्थ्यांना...

0
चित्र केवळ प्रतिनिधित्वाच्या उद्देशाने पुणे : विद्यार्थ्यांना AI ची भीती न बाळगण्याचा आणि सतत शिकण्याचा आणि स्वतःला जुळवून घेण्याचा सल्ला देत, अदानी कॉर्पोरेट...

३ वर्षाच्या चिमुरडीने चार जणांना जीवदान दिले, पुणे विभागातील सर्वात तरुण बाल अवयव दाता...

0
शहरातील घराच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून तीन वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला. पुणे : 12 जून रोजी ब्रेन डेड घोषित केलेला तीन वर्षांचा मुलगा...

गुठळ्या त्वचेच्या आजाराचा सामना करण्यासाठी महाराष्ट्रात शेळीपॉक्स लस उत्पादनास सुरुवात झाली

0
प्रातिनिधिक हेतूसाठी चित्र पुणे : राज्य पशुसंवर्धन विभागाच्या पशुवैद्यकीय जैविक उत्पादनांच्या संस्थेने (IVBP) प्रथमच गुरांचे ढेकूळ त्वचा रोग (LSD) पासून संरक्षण करण्यासाठी गोटपॉक्स...

कर्जमाफी योजनेनंतर कंपनी सेक्रेटरी कोर्समध्ये 1,000 पर्यंत ड्रॉपआउट्स पुन्हा सामील होतात

0
इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष पवन चांडक पुण्यात बोलत होते पुणे : इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) ने...

‘अनुकूल कामाची नियुक्ती नाकारली’: प्रकल्प व्यवस्थापकांनी पुण्यातील तंत्रज्ञांना आत्महत्येकडे कसे वळवले

0
प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते पुणे : पुणे जिल्ह्यातील ४८ वर्षीय आयटी व्यावसायिकाच्या कथित आत्महत्येनंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आयटी फर्मच्या दोन कर्मचाऱ्यांसह तिघांविरुद्ध...

Translate »
error: Content is protected !!