Homeताज्या बातम्याअहिरे पाईट हद्दीत ठाकरवस्ती येथे भीषण आग – ५ आदिवासी कुटुंबांचे संसार...

अहिरे पाईट हद्दीत ठाकरवस्ती येथे भीषण आग – ५ आदिवासी कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त

  • पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर अहिरे पाईट हद्दीतील ठाकरवस्ती येथे लागलेल्या भीषण आगीत पाच आदिवासी कुटुंबांची घरे जळून खाक झाली असून १७ ते १८ सदस्यांचा संसार अक्षरशः उघड्यावर आला आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

या आगीत खालील कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे:

सोपान बबन केदारी

भोराबाई कृष्णा केदारी

ज्ञानेश्वर बबन केदारी

कृष्णा पांडू केदारी

गीताबाई सावळेराम जाधव

आगीत घरांसह संपूर्ण संसार जळून खाक झाला. घरातील भांडी, धान्य, कपडे, लहान मुलांचे शालेय साहित्य, तसेच शेळ्या व पाळीव प्राण्यांचाही नाश झाला आहे. या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

घटनेची माहिती मिळताच खेड तालुक्यातील आमदार बाबाजीशेठ काळे यांच्या माध्यमातून मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ॲड. अनुराग जैद यांनी घटनास्थळी भेट देऊन पीडित कुटुंबांचे सांत्वन केले व तात्काळ ११,००० रुपयांची रोख मदत सुपूर्त केली. तसेच तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

यावेळी पंचायत समिती सदस्या सौ. सारिकाताई अर्जुन गोगावले यांनी प्रत्येक कुटुंबाला ५,००० रुपये प्रमाणे एकूण २५,००० रुपयांची मदत दिली.

या प्रसंगी महेश शेटे, शशिकांत आहेरकर, उद्योजक अर्जुन गोगावले, ग्रामसेवक जंगले भाऊसाहेब यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🤝 मदतीचे आवाहन

या भीषण आगीत सर्वस्व गमावलेल्या कुटुंबांना पुन्हा उभे राहण्यासाठी समाजातील सर्व स्तरातून मदतीची गरज आहे. जे शक्य असेल ती मदत या कुटुंबांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन ॲड. अनुराग जैद यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आवेगपूर्ण नोकरी करू नका, org मध्ये भूमिका बदलण्याचा प्रयत्न करा: अदानी GCC सीईओ विद्यार्थ्यांना...

0
चित्र केवळ प्रतिनिधित्वाच्या उद्देशाने पुणे : विद्यार्थ्यांना AI ची भीती न बाळगण्याचा आणि सतत शिकण्याचा आणि स्वतःला जुळवून घेण्याचा सल्ला देत, अदानी कॉर्पोरेट...

३ वर्षाच्या चिमुरडीने चार जणांना जीवदान दिले, पुणे विभागातील सर्वात तरुण बाल अवयव दाता...

0
शहरातील घराच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून तीन वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला. पुणे : 12 जून रोजी ब्रेन डेड घोषित केलेला तीन वर्षांचा मुलगा...

गुठळ्या त्वचेच्या आजाराचा सामना करण्यासाठी महाराष्ट्रात शेळीपॉक्स लस उत्पादनास सुरुवात झाली

0
प्रातिनिधिक हेतूसाठी चित्र पुणे : राज्य पशुसंवर्धन विभागाच्या पशुवैद्यकीय जैविक उत्पादनांच्या संस्थेने (IVBP) प्रथमच गुरांचे ढेकूळ त्वचा रोग (LSD) पासून संरक्षण करण्यासाठी गोटपॉक्स...

कर्जमाफी योजनेनंतर कंपनी सेक्रेटरी कोर्समध्ये 1,000 पर्यंत ड्रॉपआउट्स पुन्हा सामील होतात

0
इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष पवन चांडक पुण्यात बोलत होते पुणे : इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) ने...

‘अनुकूल कामाची नियुक्ती नाकारली’: प्रकल्प व्यवस्थापकांनी पुण्यातील तंत्रज्ञांना आत्महत्येकडे कसे वळवले

0
प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते पुणे : पुणे जिल्ह्यातील ४८ वर्षीय आयटी व्यावसायिकाच्या कथित आत्महत्येनंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आयटी फर्मच्या दोन कर्मचाऱ्यांसह तिघांविरुद्ध...

Translate »
error: Content is protected !!