Homeताज्या बातम्यासंत रोहिदास महाराज जयंतीनिमित्त विविध उपक्रम; सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान

संत रोहिदास महाराज जयंतीनिमित्त विविध उपक्रम; सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान

पुणे : अशोक कुंभार/
संत रोहिदास सामाजिक व सांस्कृतिक संस्था यांच्या वतीने संत रोहिदास महाराज यांची ६४९ वी जयंती विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमास प्रारंभ होण्यापूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
त्यानंतर कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात संत रविदास महाराज यांच्या भक्ती गीताने करण्यात आली. यावेळी समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना ‘समाज भूषण पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले.
कार्यक्रमास नवनिर्वाचित नगरसेवक प्रशांत मामा तुपे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर सोशल मीडिया कार्याध्यक्ष निलेश भाऊ म्हैसने, तसेच सामाजिक कार्यकर्ते अमित गायकवाड, संजय शिंदे, नरसिंग सोनवणे, प्रवीण टिंटोरे, गिरधारी बसेरे, सुनील चंद्र, शंकर बसिरे, प्रकाश पिंपळे, भीमराव गायकवाड, रोहिदास थोरात, अक्षय दादा आबनावे, हरी सावंत, शुभम बशिरे, दत्ता गुळोळी, संजू गणबास, बबन बनसोडे, राजू वाघमारे, अविनाश बनसोडे, प्रीतम पाखरे, बबन काठोठे, प्रवीण उतपुरे, पन्नालाल बशिरे, किशोर कवळे, बाबूलाल परमेश्वर, गोपाल परसे, विनोद परसे, दीपक खरात आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात प्रशांत राठोड सर व श्रुतिका क्षीरसागर यांनी सादर केलेल्या भक्ती गीतांनी उपस्थितांची मने जिंकली व कार्यक्रमात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदक विठ्ठल मदने यांनी प्रभावीपणे केले.
कार्यक्रमाच्या शेवटी संत रोहिदास सामाजिक व सांस्कृतिक संस्थेचे अध्यक्ष शाम भाऊ टिंटोरे यांनी उपस्थित सर्व मान्यवर, कलाकार आणि नागरिकांचे आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महा मेट्रो, पीएमपीएमएल शहरभर अखंड ट्रेन-बस प्रवासासाठी ‘एक प्रवास, एक तिकीट’ प्रणाली शोधत आहे

0
एकात्मिक तिकीट व्यतिरिक्त, महा मेट्रो आणि पीएमपीएमएल फीडर कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यावर देखील भर देत आहेत पुणे : महा मेट्रो आणि पीएमपीएमएल ट्रेन आणि...

विश्रांतवाडी रोडवरील बीआरटीएस लेन पाडण्यास पीएमसीच्या स्थायी समितीने मंजुरी दिली आहे

0
PMC स्थायी समितीने विश्रांतवाडी रोडवरील 4.5 किमी समर्पित बस कॉरिडॉर हटविण्यास मंजुरी दिली आहे. पुणे : बीआरटीएस लेन पाडण्याच्या प्रलंबित निर्णयाने अखेर अंतिम...

पुण्याच्या बागायतदारांनी विदेशी फळे आणि औषधी वनस्पती घेतल्याने टेरेस उष्णकटिबंधीय बनतात

0
शहरातील घराच्या बागेतून एवोकॅडोची नवीन कापणी पुणे : पुण्यातील गृह बागायतदारांची वाढती संख्या टेरेस, बाल्कनी आणि घरामागील अंगणांचे रूपांतर मिनी फार्ममध्ये करत आहेत,...

राम मंदिरातील दानरकमेची चोरी उघड; कर्मचाऱ्याच्या घरातून ₹१० लाखांची रोकड जप्त

0
पुणे /प्रतिनिधी रोहिदास कदम मिळालेल्या माहिती अनुषंगाने अयोध्येतील राम मंदिरातील दानपेटीतील रक्कम चोरीप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत मंदिरातील एका कर्मचाऱ्याच्या घरातून सुमारे ₹१० लाखांची...

आवेगपूर्ण नोकरी करू नका, org मध्ये भूमिका बदलण्याचा प्रयत्न करा: अदानी GCC सीईओ विद्यार्थ्यांना...

0
चित्र केवळ प्रतिनिधित्वाच्या उद्देशाने पुणे : विद्यार्थ्यांना AI ची भीती न बाळगण्याचा आणि सतत शिकण्याचा आणि स्वतःला जुळवून घेण्याचा सल्ला देत, अदानी कॉर्पोरेट...

Translate »
error: Content is protected !!