“नोकरी गेली तरी चालेल, पण बाबासाहेबांचा अपमान सहन करणार नाही” – माधवी जाधव
नाशिक | प्रतिनिधी रविदास कदम
भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनी नाशिक येथे घडलेल्या भाषणाच्या वेळी घटनेने राज्यभरात खळबळ उडवली आहे. फॉरेस्ट उपविभागातील महिला कर्मचारी माधवी जाधव यांनी संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानासाठी अत्यंत ठाम आणि धाडसी भूमिका घेतली.
प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमादरम्यान बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख न झाल्याने आणि त्यांच्या प्रतिमेबाबत काही ठिकाणी दुर्लक्षामुळे संतप्त झालेल्या वंचित बहुजन समाज व माधवी जाधव यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की,
“नोकरी गेली तरी चालेल, वाळूच्या गाड्या खाली करीन; पण बाबासाहेबांचा आंबेडकर अपमान कदापि सहन करणार नाही.”
त्यांनी पुढे आक्रमक भूमिका घेत म्हणाल्या की,
बाबासाहेबांचे आंबेडकर नाव कायम आमच्याच राहील.”
त्यांच्या या वक्तव्यामुळे कार्यक्रमस्थळी उपस्थितांमध्ये एकच खळबळ उडाली.
या घटनेनंतर मंत्री महोदय गिरीश महाजन यांनी याबाबत प्रतिक्रिया देत दिलगिरी व्यक्त केली. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत कोणताही अपमानाचा हेतू नसल्याचे सांगत त्यांनी या प्रकरणावर खेद व्यक्त केला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली असून,
“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान हा संविधानाचा अपमान आहे. संबंधितांवर ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा,”
अशी स्पष्ट मागणी त्यांनी केली आहे.
७७ व्या प्रजासत्ताक दिनासारख्या पवित्र दिवशी संविधाननिर्मात्या बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा व विचारांचा अवमान होणे ही गंभीर बाब असून, या घटनेमुळे सामाजिक संघटना, आंबेडकरी चळवळ व जागरूक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान, प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन दोषींवर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा प्रकारांची पुनरावृत्ती होऊ नये, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम
























