Homeताज्या बातम्याभिवरीतील तरुणांच्या सतर्कतेमुळे हरवलेली दोन मुले सुखरूप पालकांच्या स्वाधीन भिवरी

भिवरीतील तरुणांच्या सतर्कतेमुळे हरवलेली दोन मुले सुखरूप पालकांच्या स्वाधीन भिवरी

भिवरी (प्रतिनिधी.अशोक कुंभार
भिवरी–बोपगाव येथील श्री कानिफनाथ मंदिर परिसरात दर्शनासाठी आलेली आणि गर्दीत हरवलेली दोन लहान मुले भिवरी गावातील जागरूक तरुणांच्या सतर्कतेमुळे व सासवड पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप आपल्या आईच्या कुशीत परतली. या घटनेमुळे परिसरात तरुणांच्या सामाजिक जाणिवेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
हडपसर (सातव नगर) येथील रहिवासी असलेल्या श्रीमती श्रीदेवी दुधभाते या आपल्या बहिणीच्या मुलासोबत व स्वतःच्या मुलांसह कानिफनाथ गडावर दर्शनासाठी आल्या होत्या. दर्शनासाठी झालेल्या गर्दीत गणेश खंडाप्पा मरगे व मान्तेश बिराप्पा दुधभाते ही दोन लहान मुले आईच्या नजरेतून सुटून रस्ता चुकत भिवरी गावाच्या परिसरात पोहोचली.
घाबरलेल्या अवस्थेतील ही मुले स्थानिक तरुण आर्यन श्रीकांत येळंवडे, स्वराज संतोष कटके, सारंग तुषार कटके, करुण अजय ढवळे, विवेक नानासो येळंवडे आणि तन्मय योगेश कटके यांच्या निदर्शनास आली. मुलांकडे चौकशी केली असता ती हरवलेली असल्याचे लक्षात येताच, या तरुणांनी वेळ न दवडता सासवड पोलीस स्टेशनशी संपर्क साधून मुलांना स्वतः पोलिसांच्या ताब्यात दिले.
सासवड पोलीस स्टेशनचे पी.एस.आय. अर्जुन चोरगे, अविनाश होळकर व अक्षय चिले यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने तपास सुरू केला. मुलांच्या नातेवाईकांचा शोध घेऊन हडपसर येथील त्यांच्या आईशी संपर्क साधण्यात आला. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दोन्ही मुलांना त्यांच्या आई श्रीदेवी दुधभाते यांच्या स्वाधीन करण्यात आले.
आपली मुले सुखरूप मिळाल्याने दुधभाते कुटुंबीयांनी भिवरीतील तरुण आणि सासवड पोलीस प्रशासनाचे डोळ्यात पाणी आणून आभार मानले. तरुणांच्या या सामाजिक बांधिलकीचे व तत्परतेचे सर्वत्र स्वागत होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सायबर फसवणूक पीडितांना प्रत्येक खेचर खात्यातून 50k पर्यंत पैसे मिळू शकतात

0
बनावट स्टॉक ट्रेडिंग ॲप्लिकेशनद्वारे गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवणाऱ्या सायबर घोटाळेबाजांकडून तेल्लापूर येथील एका ४७ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनीअरने ३.२६ कोटी रुपये गमावले आहेत. पीडितेने...

अधिक मास महोत्सवात भक्ती, ज्ञान आणि हरिनामाचा संगम; भाविकांना अध्यात्मिक मेजवानी रंगनाथ महाराज परभणीकर...

0
आळंदी (प्रतिनिधी रोहिदास कदम)पवित्र अधिक मासानिमित्त आयोजित करण्यात आलेला अधिक मास महोत्सव ब्र. भू. रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी व ब्र. भू. गुरुवर्य श्री किसन...

महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये पिकअप व्हॅन विहिरीत पडल्याने 8 जणांचा मृत्यू झाला आहे

0
महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये पिकअप व्हॅन विहिरीत पडल्याने 8 जणांचा मृत्यू झाला आहे कोल्हापूर : म्हसवड-पंढरपूर मार्गावरील तांदुळवाडी गावात रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास १४...

इंद्रायणी नदीत हजारो माशांचा मृत्यू; प्रशासन झोपेत, वारकऱ्यांमध्ये संतापाचा उद्रेक!

0
पुणे सासवड (प्रतिनिधी अशोक कुंभार) देहू नगरीतील पवित्र इंद्रायणी नदीत हजारो मासे मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या तोंडावर घडलेल्या...

पुणे विद्यापीठाच्या ५० हून अधिक अभ्यासक्रमांसाठी जागांपेक्षा कमी अर्जदार

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रवेशाचे मोठे संकट आहे पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) मधील लक्षणीय शैक्षणिक कार्यक्रम त्यांच्या मंजूर प्रवेशाची पूर्तता करण्यासाठी...

Translate »
error: Content is protected !!