Homeताज्या बातम्यासासवड नगरपरिषद निवडणूक 2025 — भाजपा उमेदवारांकडून प्रचंड विजयाची अपेक्षा

सासवड नगरपरिषद निवडणूक 2025 — भाजपा उमेदवारांकडून प्रचंड विजयाची अपेक्षा

सासवड (प्रतिनिधी: अशोक कुंभार) — सासवड नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारीला प्रारंभ केला आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून श्रीमती आनंदी काकी जगताप हे रिंगणात असून प्रभाग क्रमांक चार मधून श्री सोपान एकनाथ रणपिसे हे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. तसेच प्रभाग चारमधील भाजपा उमेदवार सौ. स्मिता सुहास जगताप यांची बिनविरोध निवड झाल्याने पक्षात उत्साहाचे वातावरण आहे.
येत्या २ डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानात भाजपाच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावे, असे आवाहन प्रभाग ४ चे उमेदवार श्री सोपानराव रणपिसे यांनी मतदारांना केले.
“सासवड शहराला आदर्श नगर बनवणे हेच मिशन” — सोपान रणपिसे
आमच्या प्रतिनिधींशी बोलताना रणपिसे म्हणाले:
“माजी आमदार माननीय संजय जगताप यांनी शाहू–फुले–आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपला. स्व. आमदार चंदूकाका जगताप यांचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
“सासवडने स्वच्छता अभियानात देशातील स्वच्छ शहर म्हणून प्रथम क्रमांक मिळवला, ही शहराची मोठी कामगिरी आहे.”
“भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनातील अभ्यासिकेमुळे आजपर्यंत 78 विद्यार्थी प्रशासन सेवेत रुजू झाले आहेत.”
“कोविड काळात सुरू केलेल्या ‘आनंदित हाळी’ मार्फत हजारो नागरिकांना अन्नपुरवठा करण्यात आला. कोविड सेंटर उभारून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली.”
“सासवड शहरात घंटागाडी सेवा, दारोदार कचरा संकलन, स्वच्छता उपक्रम, नागरिकांसाठी विविध सुविधा सातत्याने उपलब्ध केल्या.”
कमळ चिन्हावर विश्वास — नागरिकांचा प्रतिसाद उत्साहवर्धक
स्थानिक नागरिकांनी सांगितले की, नगराध्यक्ष पदाचे आणि 21 नगरसेवक पदाचे उमेदवार यांनी शहरासाठी सातत्याने केलेली कामे पाहता यंदाच्या निवडणुकीत कमळ चिन्हाला प्रचंड बहुमत मिळेल, असा विश्वास वाटतो.
कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती
या प्रसंगी मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. त्यामध्ये —
श्री सुरेश केशवराम पिसे, अमर अरुण रणपिसे, स्वप्नील अरुण रणपिसे, गणेश प्रदीप रणपिसे, सुशील महादेव रणपिसे, कुणाल रणपिसे, चक्रधारी सोनवणे, पंढरीनाथ रणपिसे, संतोष चौरे, रितेश साळवे, विक्रांत रणपिसे तसेच अनेक कार्यकर्ते सहभागी होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जयंत पाटील यांच्या पुतण्याने एनसीपी (एसपी) सोडण्याचे संकेत दिले, म्हणतात की आजच्या राजकारणात निष्ठा...

0
पुणे : राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पुतणे आणि माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी लवकरच पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचे संकेत...

पत्नीने जीवन संपवल्यानंतर तांत्रिकाविरुद्ध एफआयआर

0
पुणे : वाघोली येथील त्यांच्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास पत्नी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने वाघोली पोलिसांनी एका तांत्रिकाविरुद्ध (३९) आत्महत्येस...

पाणी कनेक्शन नियमित करण्यासाठी पीएमसी कर्जमाफी योजनेची घोषणा झाल्यानंतर वर्षभरात केवळ 300 अर्जदार मिळाले

0
पुणे: बेकायदेशीर नळजोडणी नियमित करण्यासाठी पीएमसीच्या कर्जमाफी योजनेची घोषणा झाल्यानंतर वर्षभरात केवळ ३०० ग्राहक सापडले आहेत.नागरी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या योजनेचा उद्देश बेकायदेशीर पाणी कनेक्शन...

बाहेरगावी जाताना इंद्रायणी नदीत बुडून एकाचा मृत्यू

0
पुणे : तळेगाव दाभाडेजवळील कुंड मळा येथे शुक्रवारी दुपारी इंद्रायणी नदीत एका २४ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला. प्रथमेश लोणारे असे पीडित तरुणाचे नाव...

IAF लढाऊ विमानाच्या ‘हार्ड लँडिंग’मुळे पुण्याची धावपट्टी बंद, रात्रीच्या उड्डाणांवर परिणाम

0
पुणे: भारतीय हवाई दलाच्या (IAF) विमानाचा समावेश असलेल्या एका घटनेनंतर त्याची धावपट्टी लँडिंग आणि टेक-ऑफसाठी बंद करण्यात आल्याने शुक्रवारी रात्री 11 च्या...

Translate »
error: Content is protected !!